कोरोना प्रतिबंधक लस घेऊनही अमरावतीतले 17 आरोग्य कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. या सगळ्या कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस देण्यात आला होता. अमरावती, अकोला आणि यवतमाळ या शहरांमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन या ठिकाणी पुन्हा एकदा निर्बंध लादण्याबाबत ठाकरे सरकार गंभीर आहे.
ADVERTISEMENT
अमरावती, अकोला आणि यवतमाळ या तीन शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाडत असल्याचं आढळून आलं आहे. 1 फेब्रुवारीपासून पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या या तिन्ही शहरांमध्ये वाढू लागली आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. मुंबईपेक्षा जास्त प्रमाणात या तीन शहरांमध्ये रूग्ण वाढत आहेत. त्यामुळे या तिन्ही शहरांबाबत कठोर निर्णय घेतला जाऊ शकतो असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
अकोल्यात काय काय निर्बंध लावण्यात आले आहेत?
लग्न समारंभात 50 पेक्षा जास्त लोकांना जमता येणार नाही
हॉटेल्स, रेस्तराँमध्ये मास्क, सॅनेटायझरचा वापर बंधनकारक
5 वी ते 9 वी पर्यंतच्या शाळा बंद
महाविद्यालयेही बंद
मास्क आणि सामाजिक अंतर न ठेवणाऱ्या प्रतिष्ठानांवरही दंडात्मक कारवाई केली जाणार
ग्रामीण तथा शहरी भागात पाच जणांपेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही
धार्मिक यात्रा, उत्सव, समारंभ, महोत्सव, स्नेहसंमेलने, सामूहिक कार्यक्रम सभा, बैठका यासाठी फक्त 50 व्यक्तींनाच प्रवेश दिला जाईल
मिरवणूक किंवा रॅली काढण्यावर बंदी
अशा प्रकारचे निर्बंध जिल्हाधिकारी जितेंद्र पापाळकर यांच्या आदेशानुसार लागू करण्यात आले आहेत.
बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यात 28 फेब्रुवारी पर्यंत संचारबंदी घोषित करण्यात आली आहे
सर्व शाळा आणि कॉलेजेस बंद करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
दोन दिवस आधी बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री व अन्न व औषध प्रशासन मंत्री कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
बुलढाणा जिल्ह्यात सध्या स्थित 783 सक्रिय रूग्ण आहेत
वाशिम जिल्ह्यात सध्या स्थित 178 सक्रिय रूग्ण आहेत.
ADVERTISEMENT