आई कामावर गेलेली असताना दुधासाठी रडणाऱ्या एका 2 वर्षांच्या चिमुकलीची सावत्र पित्याने नाक-तोंड दाबून हत्या केल्याची चीड आणणारी घटना भायंदरमध्ये घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी निर्दयी सावत्र बापाला बेड्या ठोकल्या आहेत.
ADVERTISEMENT
भायंदरमध्ये मंगळवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सोनाली असं मयत मुलीचं नाव असून ती दोन वर्षांची होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पूजा नावाच्या महिलेचा घटस्फोट झालेला असून, ती दुसऱ्या पतीसोबत राहते.
मुंबईत दुहेरी हत्याकांड, 89 वर्षीय वृद्धाने केली पत्नी आणि मुलीची गळा चिरून हत्या
तिला पहिल्या पतीपासून दोन मुली आहेत. एक मुलगी पहिल्या पतीसोबत राहते. तर मयत दोन वर्षांची मुलगी तिच्यासोबत राहायची. पूजा केटरिंगचं काम करते. दरम्यान, मंगळवारी सकाळी पूजा नेहमीप्रमाणे मुलीला पतीजवळ सोडून कामावर निघून गेली.
कामावर गेल्यानंतर महिलेला पतीचा फोन आला की, सोनाली पडली असून, रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुलगी जखमी झाल्याचं कळल्यानंतर महिला तातडीने रुग्णालयात गेली. तिथे मुलीला डॉक्टरांनी मृत घोषित केल्याचं कळताच तिला धक्का बसला.
कल्याण : आई-मुलीला बेदम मारहाण, घरातील दागिने आणि रोकड घेऊन चोरटे पसार
पूजा कामावर गेल्यानंतर काय घडलं?
पूजा कामावर गेल्यानंतर दोन वर्षांची चिमुकली रडत होती. तिचं रडणं थांबत नसल्याने आरोपीने तिचं नाक आणि तोंड दाबलं. त्यातच तिचा मृत्यू झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं. आई कामावर गेल्यानंतर चिमुकली दुधासाठी रडायची, त्यामुळे आरोपी नेहमी तिला मारहाण करायचा असंही मयत मुलीच्या आईने म्हटलं आहे.
नाक आणि तोंड दाबल्याने मृत्यू झाल्याचं डॉक्टरानी सांगितल्याचं मुलीची आई पूजा हिनेही सांगितलं. दरम्यान, या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने निर्दयी बापाला अटक केली.
ADVERTISEMENT