चेकअपच्या बहाण्याने कंपाऊंडरने ओपीडीत नेऊन 21 वर्षीय महिलेचा केला विनयभंग, लातूरमधली घटना

मुंबई तक

• 01:21 PM • 13 Dec 2021

लातूर जिल्ह्यातील उद्गीर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल होऊन प्रसूती झालेल्या एका 21 वर्षीय महिलेचा रुग्णालयातील कंपाउंडरने चेकअपचे निमित्त करून ओपीडीमध्ये नेऊन विनयभंग केल्याची घटना घडली. पीडित महिलेच्या फिर्यादी वरून शहर पोलीस ठाण्यात कंपाउंडरवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शहर पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, की परिसरातील एक महिला प्रसुतीसाठी उपजिल्हा रुग्णालयात […]

Mumbaitak
follow google news

लातूर जिल्ह्यातील उद्गीर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल होऊन प्रसूती झालेल्या एका 21 वर्षीय महिलेचा रुग्णालयातील कंपाउंडरने चेकअपचे निमित्त करून ओपीडीमध्ये नेऊन विनयभंग केल्याची घटना घडली. पीडित महिलेच्या फिर्यादी वरून शहर पोलीस ठाण्यात कंपाउंडरवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

याबाबत शहर पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, की परिसरातील एक महिला प्रसुतीसाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती. तिची प्रसूती ही झाली. रविवारी (ता.12) दुपारी साडेबाराच्या दरम्यान या रुग्णालयातील कंपाउंडर आरोपी सचिन राजमाने याने या प्रसूत झालेल्या महिलेला चेकअप करण्याच्या निमित्ताने रुग्णालयातील ओपीडी रूममध्ये नेले. तेथे नेऊन या महिलेचा विनयभंग केला.

कंपाऊंडरने वाईट हेतूने स्पर्श केला अशा आशयाची फिर्याद सायंकाळी पीडित महिलेने दिल्यावरून शहर पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. 13) रात्री अडीचच्या दरम्यान या आरोपीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक गोरख दिवे, पोलीस उपनिरीक्षक सहदेव खेडकर यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. रात्री अडीच वाजता गुन्हा दाखल करून पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक जाधव यांच्याकडे देण्यात आला आहे.

या प्रकरणातला आरोपी फरार असून त्यास ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. या उपजिल्हा रुग्णालयात प्रसूत झालेल्या महिलेच्या विनयभंगाचे प्रकरण उजेडात आल्यानंतर आणखी एका दुसऱ्या महिलेचाही विनयभंग झाले असल्याची चर्चा सुरू आहे.

    follow whatsapp