Retail Inflation Latest News: महागाईच्या प्रश्नाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. सरकारने आज गुरुवारी नोव्हेंबर महिन्यातील महागाईच्या दराची आकडेवारी जारी केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे देशातील जनतेला दिलासा मिळाला आहे. ऑक्टोबर महिन्यात किरकोळ महागाई (Retail Inflation) वेगाने वाढून 6 टक्क्यांहून अधिक झाली आहे. पण नोव्हेंबर महिन्यात महागाईत घट होऊन 5.48 टक्के झाली आहे.
ADVERTISEMENT
सरकारने दिलेल्या माहितीनुसार, खाद्य पदार्थ, विशेषत: भाज्यांच्या किंमतीत झालेल्या बदलामुळे महागाई कमी झाली आहे. आरबीआयने महागाईचे दर 4-6 टक्क्यांमध्ये ठेवण्याचं निश्चित केलं आहे. अशातच महागाईचा टक्का नोव्हेंबरमध्ये 6 टक्क्यांवर घसरल्याने आरबीआयसाठी हा एक दिलासा मानला जात आहे.
हे ही वाचा >> दिल्लीत नवा डाव, अमित शाह गेले शरद पवारांच्या घरी, 'ही' भेट अन् बरंच काही!
भारताचा किरकोळ महागाई दर मागील ऑक्टोबरमध्ये वाढून 6.21 टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. सप्टेंबरमध्ये हा दर 5.49 टक्के होता. सण उत्सवात हाय फूड प्राईजमुळे महागाईच्या दरात वाढ झाली आहे. ऑगस्ट 2023 नंतर हे पहिल्यांदाच घडलं की, महागाईने भारतीय रिझर्व्ह बँकच्या 6 टक्क्यांची सीमा पार केली.
हे ही वाचा >> Kurla Bus Accident Inside Video : अपघात घडल्यानंतर बसचालकाने नेमकं काय केलं? CCTV फुटेज आलं समोर
भाज्या-डाळींच्या दरात झाली घट
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO) च्या सीपीआय डेटाच्या माहितीनुसार, नोव्हेंबरमध्ये खाद्य पदार्थांचा महागाई दर घटून 9.04 टक्क्यांवर पोहोचला आहे. ऑक्टोबर महिन्यात महागाईचा दर 10.87 टक्क्यांवर पोहोचला होता. तर नोव्हेंबर 2023 मध्ये हा दर 8.70 टक्के होता. एनएसओच्या माहितीनुसार, नोव्हेंबर 2024 च्या दरम्यान भाज्या, डाळी आणि फूड प्रोडक्स्ट, साखर आणि मिठाई, फळे, अंडी, दूध आणि मसाल्यांच्या किंमतीत मोठी घट झाल्याचं समोर आलंय.
ADVERTISEMENT