व्यंकटेश दुदुमवार, प्रतिनिधी, गडचिरोली
ADVERTISEMENT
गडचिरोलीच्या चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील खासगी शाळेतले 24 विद्यार्थी कोरोना बाधित आढळल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना लिटल हार्ट इंग्लिश मिडीयम शाळेत घडली. या शाळेत नववर्ष दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित झाला होता.
या कार्यक्रमात बाहेरून देखील लोक सहभागी झाले होते. कार्यक्रमानंतर शाळेतील काही मुलांना ताप जाणवू लागल्यावर 131 विद्यार्थ्यांची तपासणी केली गेली. यातील 24 विद्यार्थी बाधित आढळले. हे सर्व विद्यार्थी इयत्ता सातवी ते अकरावीचे असल्याची माहिती मिळाली आहे. आष्टी येथील शासकीय रुग्णालयात अँटिजेन चाचणी करून सर्वांना गडचिरोली येथे उपचारासाठी दाखल केले जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान आज जिल्ह्यातील शाळाबाबत जिल्हाधिकारी आणि शिक्षण विभाग निर्णय घेणार आहेत.
महाराष्ट्रात बुधवारी 26 हजार 538 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर बुधवारी दिवसभरात 8 मृत्यू झाल्याचंही नोंदवलं गेलं आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक पुन्हा एकदा सुरू झाला आहे हेच हे आकडे सांगत आहेत. महाराष्ट्रात दिवसभरात 5331 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत 65 लाख 24 हजार 247 कोरोना रूग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 96.55 टक्के झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 97 लाख 77 हजार 7 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 67 लाख 57 हजार 32 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 13 हजार 758 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर 1366 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.
Corona : 24 तासात मुंबईतल्या 71 पोलिसांना कोरोना संसर्ग
महाराष्ट्रात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे 144 नवे रूग्ण
महाराष्ट्रात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे नवे 144 रूग्ण आढळले आहेत. या सर्व रुग्णांचे अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिले आहेत.
कुठे आहेत हे 144 रूग्ण
मुंबई-100
नागपूर-11
ठाणे आणि पुणे मनपा-7
पिंपरी चिंचवड-6
कोल्हापूर -5
अमरावती, उल्हासनगर, भिवंडी-प्रत्येकी 2
पनवेल आणि उस्मानाबाद- प्रत्येकी 1
एकूण – 144
ADVERTISEMENT