Crime news in marathi :
ADVERTISEMENT
मुंबई : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी विशेष न्यायालयाने पोक्सो कायद्यांतर्गत एका ३२ वर्षीय संशयिताला १ वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे. १६ वर्षीय मुलीच्या ओठांवरुन १०० रुपयांची नोट फिरवून तिला “मै तुझे लाईक करता हूं, तू ऐसा क्यों कर रही है और तू इतना भाव क्यूँ खा राही है?” असं विचारत तिचा विनयभंग केल्याचा संशयितावर आरोप आहे. (Crime |32 years man sent 1yr prison who sided ₹100 on minor’s lips)
पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरुन मिळालेली अधिक माहिती अशी की, संबंधित मुलगी १३ जुलै २०१७ रोजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास तिच्या काकीसोबत बाजारपेठेत गेली होती. त्यावेळी तिच्या लक्षात आलं की आरोपी तिच्याकडे सातत्याने बघत आहे. भाजी खरेदी करत असताना तो तिच्याकडे आला, तेव्हा तिनं त्याच्याकडे रागानं पाहिलं, तेव्हा आरोपीनं तिच्या ओठांवरुन १०० रुपयांची नोट फिरवत गैरवर्तन केलं. तिने आरडाओरडा केल्यावर आजूबाजूचे लोक जमा झाले पण कोणीही मदत केली नाही. ती घाबरुन घरी धाव घेत घडलेला प्रकार आईला सांगितला.
Chinchwad पोटनिवडणुकीत नवा ड्रामा, अजितदादांचंही ऐकण्यास नकार; कलाटेंचं बंड
दुसऱ्या दिवशी आई आणि मुलगी आरोपीच्या घरी गेल्या. मात्र आरोपीने दोघींनाही शिवीगाळ केली. यानंतर दोघांनी देवनार पोलीस ठाण्यात जाऊन आरोपींविरोधात तक्रार देऊन गुन्हा दाखल केला. मुलीने पोलिसांना सांगितलं की, ती कॉलेजला जायची तेव्हाही तो तिचा पाठलाग करायचा. यानंतर पोलिसांनी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर मुलीची साक्ष नोंदावली आणि सहा साक्षीदारांना न्यायालयासमोर हजर केलं.
यावेळी तक्रारदारांनी स्वतंत्र साक्षीदार का आणले नाहीत, असा सवाल आरोपींच्या वकिलांनी विचारला. पुरावे तपासल्यानंतर न्यायाधीश एस. सी. जाधव म्हणाले, “एखाद्या आरोपीचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी पीडितेची एकमेव साक्ष पुरेशी आहे. स्वतंत्र साक्षीदार तपासले जाणार नसून पीडित मुलगी सक्षम साक्षीदार अल्याचही यावेळी स्पष्ट केलं.
Pune : बापटांना घाम फोडला, आता रासनेंशी दोन हात, कोण आहेत रवींद्र धंगेकर?
न्यायालयाने १६ वर्षांच्या मुलीच्या आईच्या म्हणण्यालाही अधिक महत्त्व दिलं आणि म्हटलं की, ”कोणतीही माता खोटे आरोप करुन आपल्या पाल्याचा गैरवापर करणार नाही. सचोटी, चारित्र्य आणि भविष्य ती पणाला लावणार नाही. त्यामुळे तिची साक्ष विश्वसनीय आणि स्वीकारार्ह आहे.
ADVERTISEMENT