ठाणे : पेस्ट कंट्रोल चार वर्षाच्या मुलीच्या जिवावर बेतलं

मुंबई तक

• 11:15 AM • 16 Mar 2021

घरात पेस्ट कंट्रोल केल्यानंतर सुमारे दोन ते तीन तास घर रिकामं ठेवणं गरजेचं असतं. यानंतरही घरात प्रवेश करताना घातक रसायनांचा वास पूर्णपणे गेला आहे की नाही याची खातरजमा करायची असते. परंतू ठाण्यातील पालशेतकर कुटुंबियांचा निष्काळजीपणा त्यांच्या ४ वर्षीय मुलीच्या जिवावर बेतला आहे. घरात केलेल्या पेस्ट कंट्रोलमुळे पालशेतकर कुटुंबातील दोघांची प्रकृती बिघडली. यानंतर दोघांनाही रुग्णालयात उपचारासाठी […]

Mumbaitak
follow google news

घरात पेस्ट कंट्रोल केल्यानंतर सुमारे दोन ते तीन तास घर रिकामं ठेवणं गरजेचं असतं. यानंतरही घरात प्रवेश करताना घातक रसायनांचा वास पूर्णपणे गेला आहे की नाही याची खातरजमा करायची असते. परंतू ठाण्यातील पालशेतकर कुटुंबियांचा निष्काळजीपणा त्यांच्या ४ वर्षीय मुलीच्या जिवावर बेतला आहे. घरात केलेल्या पेस्ट कंट्रोलमुळे पालशेतकर कुटुंबातील दोघांची प्रकृती बिघडली. यानंतर दोघांनाही रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं…ज्यात ४ वर्षीय मुलीला आपले प्राण गमवावे लागले आहेत.

हे वाचलं का?

नागपूर : लॉकडाऊन मध्ये नोकरी गेली, शिक्षक बनला ड्रग्ज तस्कर

ठाण्याच्या कासरवडवली भागात राहणाऱ्या राजु पालशेतकर यांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. आपली चार वर्षांची मुलगी आणि पत्नीसह राजु पालशेतकर डेफोडिल सोसायटीमध्ये राहत होते. १३ मार्चला पालशेतकर यांच्या घरात पेस्ट कंट्रोल करण्यात आलं होतं. सुमारे दुपारी साडेतीन वाजल्याच्या दरम्यान कर्मचारी पेस्ट कंट्रोलचं काम संपवून परतले. यानंतर पाच वाजल्याच्या दरम्यान पालशेतकर कुटुंब घरात आलं. यावेळी अजुनही रसायनांचा वास घरामध्ये येत होता. परंतू या वासाकडे दुर्लक्ष करुन पालशेतकर कुटुंबाने घरात रहायचं ठरवलं. कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांनी ही माहिती दिली.

हाच निष्काळीजपणा त्यांना चांगलाच घातक ठरला. घरातील रसायनांच्या वासामुळे रात्री अडीच वाजल्याच्या दरम्यान पालशेतकरांच्या मुलीला उलटीचा त्रास व्हायला लागला, तर पत्नीलाही मळमळायला लागलं. मात्र पेस्टकंट्रोलच्या वासामुळे हे होत असावं असं गृहीत धरुन थोड्या वेळाने बरं वाटेल असं समजून पालशेतकर कुटुंब घरातचं राहिलं. परंतू दुसऱ्या दिवशी सकाळी आई आणि मुलीला पुन्हा एकदा त्रास व्हायला लागला. यानंतर परिस्थितीचं गांभीर्य ओळखत पालशेतकरांनी दोघांनाही १४ मार्चला घोडबंदर येथील नोबल रुग्णालयात दाखल केलं. उपचार सुरु असताना पत्नीच्या प्रकृतीत सुधारणा झाली…परंतू संध्याकाळपर्यंत मुलीच्या प्रकृतीत काहीच फरक पडला नाही. यानंतर सहा वाजल्याच्या दरम्यान पालशेतकरांच्या ४ वर्षीय मुलीने आपले प्राण सोडले. त्यामुळे पेस्ट कंट्रोल केल्यानंतर काळजी घेणं हे किती गरजेचं असतं हे या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध झालंय.

    follow whatsapp