हृदयद्रावक! यवतमाळमधील स्मशानभूमीत दोन दिवसात 43 जणांवर अंत्यसंस्कार

मुंबई तक

• 11:11 AM • 17 Apr 2021

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच कहर केला. दरदिवशी मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह रुग्ण संख्या वाढत असताना आता मृत्यूचे प्रमाणही कमालीचे वाढत आहे. गेल्या दोन दिवसात 69 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्यावर यवतमाळच्या पांढरकवडा रोडवरील स्मशानभूमीत नगरपालिकेच्या वतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. Corona:अहमदाबादमध्ये सहा तासात 50 मृत्यू, भोपाळमध्ये 112 मृतदेहांवर अंत्यसंस्कार यावेळी स्मशानभूमीत जिकडे तिकडे चिता […]

Mumbaitak
follow google news

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच कहर केला. दरदिवशी मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह रुग्ण संख्या वाढत असताना आता मृत्यूचे प्रमाणही कमालीचे वाढत आहे. गेल्या दोन दिवसात 69 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्यावर यवतमाळच्या पांढरकवडा रोडवरील स्मशानभूमीत नगरपालिकेच्या वतीने अंत्यसंस्कार करण्यात आले.

हे वाचलं का?

Corona:अहमदाबादमध्ये सहा तासात 50 मृत्यू, भोपाळमध्ये 112 मृतदेहांवर अंत्यसंस्कार

यावेळी स्मशानभूमीत जिकडे तिकडे चिता पेटल्याचे भयाण चित्र दिसत होते. ही मन हेलवणारी दृश्य सर्वांचा निषब्ध करणारी ठरली. आपल्या आप्त जणांचे अंतिम दर्शन व्हावे यासाठी नातेवाईक प्रयत्न करत होते, मात्र कोरोनामुळे त्यांना दर्शनही घेता येत नव्हते. एकाचवेळी इतक्या मोठ्या प्रमाणात अंतिम संस्कार करण्याची ही यवतमाळ जिल्हयातील पहिलीच वेळ असावी.

उस्मानाबाद- 23 जणांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार;
अंतिम दर्शनासाठीची नातेवाईकांची धडपड

कोरोना ग्रस्तांच्या मृत्यूचा आकडा वाढल्याने मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीत सध्या जागाही अपुरी पडत आहे.  आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे 843 जणांनी आपला जीव गमावला असून सध्या स्थितीत 4987 ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहे.

यवतमाळवरील आकडेवारी

  1. 10 एप्रिल पॉझिटिव्ह 627, मृत्य 08

  2. 11 एप्रिल पॉझिटिव्ह 720, मृत्यू12

  3. 12 एप्रिल पॉझिटिव्ह 588 मृत्यू13

  4. 13 एप्रिल पॉझिटिव्ह 953, मृत्यू 23

  5. 14 एप्रिल पॉझिटिव्ह 790, मृत्यू 13

  6. 15 एप्रिल पॉझिटिव्ह 906, मृत्यू 22

  7. 16 एप्रिल पॉझिटिव्ह 1237, मृत्यू 26

पॉझिटिव्हीटी दर 11.69

मृत्यू दर 2.19

    follow whatsapp