नागपूर : मृत्यूचा आकडा कमी होईना, आज ६५ जणांनी कोरोनाशी लढताना गमावले प्राण

मुंबई तक

• 11:55 AM • 10 Apr 2021

राज्याच्या उप-राजधानीला बसलेला कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा विळखा काही केल्या कमी होत नाहीये. गेल्या काही दिवसांपासून नागपुरात कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होण्याचं नावच घेत नाहीये. गेल्या २४ तासांत नागपूर जिल्ह्यात ६५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याचसोबत २४ तासांत जिल्ह्यामध्ये ५ हजार १३१ नवे रुग्ण सापडल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर येणारा ताण दिवसेंदिवस वाढत चालला आहे. […]

Mumbaitak
follow google news

राज्याच्या उप-राजधानीला बसलेला कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा विळखा काही केल्या कमी होत नाहीये. गेल्या काही दिवसांपासून नागपुरात कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होण्याचं नावच घेत नाहीये. गेल्या २४ तासांत नागपूर जिल्ह्यात ६५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

हे वाचलं का?

याचसोबत २४ तासांत जिल्ह्यामध्ये ५ हजार १३१ नवे रुग्ण सापडल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर येणारा ताण दिवसेंदिवस वाढत चालला आहे. नागपुरातली वाढती रुग्णसंख्या पाहता जिल्हा प्रशासनाने नागपुरातील काही रुग्णांवर अमरावतीच्या रुग्णालयात उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे आरोग्य यंत्रणेवर ताण येत असताना शहरातील हॉस्पिटलमध्ये आग लागल्याच्या घटनेमुळे प्रशासनाच्या चिंतेत अधिक भर पडते आहे.

नागपूरच्या वेलट्रीट कोव्हिड हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये लागलेल्या आगीमुळे चार जणांचा मृत्यू झाला आहे. तीन रूग्णांचा मृत्यू आगीमुळे तर एका रूग्णाचा मृत्यू आधीच झाला असल्याची माहिती समजली आहे. 30 रूग्णांना इतर रूग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे मात्र त्यातल्याही काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतं आहे. या संपूर्ण घटनेची चौकशी होईल असं पालकमंत्री नितीन राऊत यांनी म्हटलं आहे.

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे राज्यातली परिस्थिती बिकट होत चाललेली आहे. आरोग्य यंत्रणेवर प्रत्येक दिवशी येणारा ताण हा राज्य सरकारच्या चिंतेत अधिक भर घालतो आहे. अशा परिस्थितीत नागपूरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या वेल ट्रीट हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी रात्री साडे आठ वाजल्याच्या सुमारास आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

    follow whatsapp