मोठी बातमी… 9वी आणि 11वीचे विद्यार्थी परीक्षेविना पुढच्या वर्गात जाणार, शिक्षणमंत्र्यांची घोषणा

मुंबई तक

• 03:52 PM • 07 Apr 2021

मुंबई: राज्यात कोरोनाची स्थिती ही अत्यंत बिकट आहे. याच परिस्थितीचा विचार करुन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी एक मोठी घोषणा केली आहे. यंदा नववी (9th Standered) आणि अकरावीच्या (11th Standered) विद्यार्थ्यांना थेट पुढच्या वर्गात पाठविण्यात येणार आहे. म्हणजे या इयत्तेतील सर्व विद्यार्थ्यांना आता सरसकट पास करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबद्दलची घोषणा वर्षा गायकवाड यांनी […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: राज्यात कोरोनाची स्थिती ही अत्यंत बिकट आहे. याच परिस्थितीचा विचार करुन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी एक मोठी घोषणा केली आहे. यंदा नववी (9th Standered) आणि अकरावीच्या (11th Standered) विद्यार्थ्यांना थेट पुढच्या वर्गात पाठविण्यात येणार आहे. म्हणजे या इयत्तेतील सर्व विद्यार्थ्यांना आता सरसकट पास करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबद्दलची घोषणा वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

हे वाचलं का?

दरम्यान, याआधी पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना विनापरीक्षा पास करुन पुढच्या वर्गात पाठविण्याचा निर्णय देखील काही दिवसांपूर्वीच जाहीर करण्यात आला होता. आता अशाच स्वरुपाचा निर्णय नववी आणि अकरावीबाबत देखील घेण्यात आला आहे. मात्र, असं असलं तरीही 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांची ऑफलाइनच परीक्षा होणार आहे.

पाहा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड नेमकं काय म्हणाल्या

‘मागील वर्षाचा विचार करता आणि आजची अपवादात्मक परिस्थिती पाहता आणि कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता आम्ही असा निर्णय घेत आहोत की, इयत्ता 9वी आणि इयत्ता 11वीच्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील वर्गासाठी वर्गोन्नती देण्याचा निर्णय आम्ही घेत आहोत.’

Corona मुळे राज्यात पहिली ते आठवीच्या परीक्षा होणार नाहीत, वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा

‘परंतु हा निर्णय घेत असताना मी हे देखील सांगू इच्छिते की, इयत्ता 10 आणि इयत्ता 12वी साठी 9वी आणि 11वी हा त्यांचा मजबूत पाया आहे. म्हणून मागील वर्षात जी परिस्थिती होती हे लक्षात जरी आपल्याला वर्गोन्नती दिली असली तरीही तरी भविष्यामध्ये आम्ही आपल्यासाठी विविध कार्यक्रम राबवणार आहोत. ज्याच्या माध्यमातून आपलं जे शैक्षणिक नुकसान झालं होतं ते सुद्धा भरुन निघेल आणि दहावी आणि बारावीसाठी आपण सक्षमपणे उभे राहू शकाल. या दृष्टीकोनातून आम्ही भविष्यात कार्यक्रम आखणार आहोत. पण आज या माध्यमातून मी एवढंच सांगू इच्छिते की, आज आम्ही शालेय शिक्षणाच्या माध्यमातून इयत्ता 9वी आणि 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्गोन्नती जाहीर करत आहोत.’ त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही याची देखील राज्य सरकार काळजी घेणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp