डोंबिवली पूर्वेकडील खंबाळपाडा परिसरात तलवारीने वार करत एका इसमाची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. डोंबिवलीत खंबाळपाडा भागात मच्छी विक्रेत्या महिलेला तिला व्यवसायात मदत करणाऱ्या सहकारी सोबत वाद करणाऱ्या दिराने रागाच्या भरात जिवे मारण्याची धमकी दिली. मात्र वादात स्वताचाच जीव गमावल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत काल्या उर्फ हितेश नकवाल याला अटक करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
आरोपी हितेश खंबाळपाडा येथे राहणाऱ्या मुकुंद चौधरी यांच्या वहिनीकडे काम करत होता, मुकुंदने हितेशला माझ्या वहिनीकडे काम करू नकोस असं धमकावले होतं. शनिवारी तर मुकुंदने रितेशला तलवारीचा धाक दाखवून काम सोडण्याची धमकी दिली. त्यातून या दोघांमध्ये वाद झाला आणि हितेशने मुकुंद च्या हातातील तलवार हिसकावून मुकुंद वर तलवारीने हल्ला केला या हल्ल्यात मुकुंदचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी टिळक नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी अटक करत पुढील तपास सुरू केला आहे.
मित्रानेच घेतला जीव, मृतदेह फेकला रेल्वे रुळावर; डोबिंवलीतील ‘त्या’ खुनाचं गुढ उलगडलं
6 ऑक्टोबरलाही झाली होती हत्या
रिक्षातील प्रवाशाला रस्त्यात थांबवून चोरीच्या उद्देशाने दोन जणांना ठोशा बुक्क्यांनी तसंच चाकूने मारहाण करून त्यातील एकाची हत्या करण्याचा प्रकार डोंबिवलीत 6 ऑक्टोबल घडला. तर दुसऱ्याला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना त्यादिवशी रात्री रात्री साडे बाराच्या सुमारास ठाकुर्ली समांतर रस्ता परिसरात घडली होती. या घटनेचं गुढ २४ तासांत उलगडलं आहे.
ठाकुर्ली समांतर रस्ता परिसरात बेचनप्रसाद चौहान या तरुणाची हत्या करण्यात आली होती. तर बबलू चौहान याला जखमी करण्यात आलं होतं. या प्रकरणी डोंबिवलीतील टिळक नगर पोलीस आणि रेल्वे पोलीसांनी तपास सुरू केल्यानंतर ही हत्या चोरीच्या उद्देशानं केली गेली नसल्याचं स्पष्ट झालं. मात्र तपासात पुढे आले की वरील कोणता प्रकार घडला नसून मित्रानेच मित्राचा खून केली.
ADVERTISEMENT