महाराष्ट्रात येऊ घातलेला वेदांता फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रोजेक्ट गुजरातला गेला. या मुद्द्यावर आदित्य ठाकरे शिंदे सरकारविरोधात थेट फ्रंटफुटवर आल्याचं दिसलं. त्यानंतर आता नगरविकास खात्यातंर्गत होत असलेल्या वर्सोवा-वांद्रे सी लिंक प्रोजेक्टसाठीच्या नोकर भरतीवरून आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा खिंडीत पकडलंय.
ADVERTISEMENT
शिवसेनेतल्या बंडानंतर आदित्य ठाकरे शिंदे गटाविरोधात आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे. वेदांता-फॉक्सकॉन प्रोजेक्टने आदित्य ठाकरेंना शिंदे सरकारला खिंडीत गाठण्याची संधीच मिळाली. त्यानंतर आता वर्सोवा-वांद्रे सी लिंक प्रोजेक्टसाठी भरतीवरून आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलंय.
आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना का लक्ष्य केलंय?
मुंबईत वर्सोवा-वांद्रे सी लिंक प्रोजेक्ट नगरविकास खात्यातंर्गत असलेल्या एमएसआरडीसी विभागाकडून सुरू आहे. या रोडवर चार टोल नाके प्रस्तावित असून, यासाठीची कंपनी बदलण्यात आलीये. हा मुद्दा आदित्य ठाकरेंनी उपस्थित केलाय.
Aditya Thackeray: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज महाराष्ट्रासाठी दिल्लीत गेलेत की स्वतःसाठी?
त्याचबरोबर या प्रोजेक्टसाठी जी कंपनी निवडण्यात आलीये, त्या कंपनीकडून प्रोजेक्टसाठी विविध पदांसाठी भरती केली जातेय. मुंबईत होणाऱ्या प्रोजेक्टसाठी कंपनीकडून चेन्नईमधील रामदा प्लाझा येथे मुलाखती होणार आहेत. यावरच आदित्य ठाकरेंनी आश्चर्य व्यक्त केलंय. इतकंच नाही तर एकनाथ शिंदेंना सवालही केलाय.
‘शिंदेंजी, तुमच्या नाकाखाली काय सुरूये’; आदित्य ठाकरे नक्की काय म्हणाले?
वर्सोवा-वांद्रे सी लिंक प्रोजेक्टसाठी चेन्नईत होत असलेल्या प्रोजेक्टवरूनच आदित्य ठाकरेंनी शिंदेंना कोंडीत पकडलंय. या प्रोजेक्टमध्ये स्थानिक भूमिपत्रांना संधी न देण्यामागे हेतू काय आहे? या मुलाखती महाराष्ट्रात का होत नाहीयेत?’, असे प्रश्न आदित्य ठाकरेंनी उपस्थित केलाय.
तेजस ठाकरे राजकारणात येणार का? आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…
‘हा महत्त्वाचा प्रोजेक्ट एमएसआरडीसी विभागातंर्गत हो आहे. हा विभाग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. तसेच यापूर्वीच्या सरकारमध्येही एकनाथ शिंदे हेच या खात्याचे प्रमुख होते. त्यामुळे त्यांच्या खात्यात त्यांच्या नाकाखाली काय सुरूये याचं उत्तर एकनाथ शिंदेंनी दिलं पाहिजे. ते यामागचं कारण शोधणार आहेत. राज्यातील तरुणांशी विश्वासघात का?’, असा सवाल आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारला केलाय.
ADVERTISEMENT