सध्या महाराष्ट्रासह देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून सावरतो आहे. अशात कोरोनाचा नवा व्हेरिएंटने ओमिक्रॉनने दहशतीचं वातावरण निर्माण केलं आहे. अशात पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी धक्कादायक माहिती दिली आहे. मागील 19 दिवसात एक हजारांच्या आसपास प्रवासी दक्षिण अफ्रिकेतून मुंबईत आले आहेत अशी माहिती दिली आहे. अफ्रिका आणि युरोपियन देशांमध्ये कोरोनाचा ओमिक्रॉनचा संसर्ग पसरतो आहे. अशात आदित्य ठाकरे यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे चिंतेत नक्कीच भर पडली आहे.
ADVERTISEMENT
Omicron Variant: ओमिक्रॉन व्हेरिएंटची दहशत, भारत सरकारकडून नव्या गाइडलाइन जारी
काय म्हणाले आहेत आदित्य ठाकरे?
’10 नोव्हेंबरपासून दक्षिण अफ्रिकेतून एक हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत. आत्तापर्यंत जे लोक आले आहेत त्यांची माहिती आपण मिळवली आहे. जे मुंबईत आहेत त्यांना पालिकेकडून फोन केले जात आहेत. एवढंच नाही तर परदेशातून गेल्या दहा दिवसात आलेल्या सगळ्यांना संपर्क साधून त्यांची विचारपूस केली जाते आहे. तसंच संस्थात्मक विलीगकरणाची व्यवस्थाही केली जाते आहे.’ असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.
कोरोना विषाणूचं नवं व्हेरिएंट अर्थात ओमिक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी काय करता येईल? याबाबत आज कॅबिनेट मिटिंगमध्ये चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची माहिती नियमित रित्या मिळावी जेणेकरून त्यांच्यावर लक्ष ठेवता येईल आणि संसर्ग रोखता येईल असं म्हटलं आहे.
ओमिक्रॉनच्या धोक्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर सतर्कतेचा आदेश दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी संध्याकाळी कोरोना विषाणूच्या या नव्या म्युटेशनचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बठक घेतली. या वेळी सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, राज्याच्या टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
ओमिक्रॉनचा संसर्ग झाल्यानंतर कोणती लक्षणं दिसतात?
सर्वात आधी ओमिक्रॉन व्हेरिएंट ओळखणाऱ्या दक्षिण आफ्रिकेतील डॉ. एंजलिक कोएट्जी यांनी ‘बीबीसी’ला दिलेल्या माहिती माहितीत सांगितलं की, ‘या व्हेरिएंटचे लक्षणं मी सर्वात आधी कमी वयातील रुग्णामध्ये बघितले. ही व्यक्ती 30 वर्षांची होती. या व्हेरिएंटचा संसर्ग झाल्यानंतर रुग्णाला प्रचंड थकवा जाणवतो. त्याचबरोबर डोकेदुखीचा त्रासही होतो. संसर्ग झाल्यानंतर शरीरही ठणकतं. घशातही त्रास होतो. महत्त्वाचं म्हणजे या रुग्णाला खोकलाही नव्हता आणि आणि त्याला वास गेल्याचीही लक्षणं नव्हती.’
ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झाल्यानंतर माईल्ड लक्षणं आढळून येत असल्याचं तज्ज्ञाचं म्हणणं आहे. या रुग्णांना तीव्र लक्षणं दिसून येत नाहीत. डॉ. कोएट्ज यांनी सांगितलं की, ‘दक्षिण आफ्रिकेत जेव्हा ओमिक्रॉन व्हेरिएंटचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर पुर्ण कुटुंबाची तपासणी करण्यात आली. त्यावेळी संपूर्ण कुटुंबातील लोकांना या व्हेरिएंटचा संसर्ग झालेला होता. त्या सगळ्यांना व्हेरिएंटमुळे हलक्या स्वरूपाची लक्षणं दिसून आली.’
ADVERTISEMENT