बोरीवलीत बसच्या खाली स्कुटर आल्याने अपघात, तरूणाचा मृत्यू

मुंबई तक

• 08:08 AM • 10 Apr 2021

बोरीवलीमध्ये बसच्या खाली स्कुटर आल्याने अपघात झाला. या घटनेत एका 19 वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला. मुंबईतल्या बोरीवलीमध्ये दौलत नगर भागात उत्सव हॉटेलच्या समोर हा अपघात झाला. या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे. अमन यादव असं मृत्यू झालेल्या तरूणाचं नाव आहे. हा तरूण अंबावाडीमध्ये राहात होता. शुक्रवारी संध्याकाळी हा अपघात झाला आहे. या तरूणाचा मृतदेह […]

Mumbaitak
follow google news

बोरीवलीमध्ये बसच्या खाली स्कुटर आल्याने अपघात झाला. या घटनेत एका 19 वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला. मुंबईतल्या बोरीवलीमध्ये दौलत नगर भागात उत्सव हॉटेलच्या समोर हा अपघात झाला. या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे. अमन यादव असं मृत्यू झालेल्या तरूणाचं नाव आहे. हा तरूण अंबावाडीमध्ये राहात होता. शुक्रवारी संध्याकाळी हा अपघात झाला आहे. या तरूणाचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी शताब्दी रूग्णालयात पाठवण्यात आला आहे. सदर घटनेचा तपास पोलीस करत आहेत.

हे वाचलं का?
    follow whatsapp