बुलढाणा : अल्पवयीन मुलीवर बलात्कार, नंतर सॉरी बोलून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न, आरोपी अटकेत

मुंबई तक

• 07:38 AM • 18 Oct 2021

बुलढाणा जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे या कृत्यात आरोपीला साथ देणाऱ्या पीडितेच्या दोन मैत्रिणींवरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीने आपल्या पालकांच्या मदतीने मलकापूर पोलीस ठाण्यात यासंबंधी तक्रार दाखल केली होती. पीडित तरुणी आपल्या दोन मैत्रिणींसोबत घरात गप्पा मारत असताना आरोपी भूषण बोरसेने दोन मैत्रिणींकरवी […]

Mumbaitak
follow google news

बुलढाणा जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे या कृत्यात आरोपीला साथ देणाऱ्या पीडितेच्या दोन मैत्रिणींवरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीने आपल्या पालकांच्या मदतीने मलकापूर पोलीस ठाण्यात यासंबंधी तक्रार दाखल केली होती.

हे वाचलं का?

पीडित तरुणी आपल्या दोन मैत्रिणींसोबत घरात गप्पा मारत असताना आरोपी भूषण बोरसेने दोन मैत्रिणींकरवी आपल्याला बोलायचं असल्याचं सांगितलं. परंतू पीडित तरुणीने भूषणशी बोलण्यास नकार दिल्यानंतर दोन मैत्रिणींनी पीडित तरुणीची समजूत काढत तिला भूषणसोबत बोलण्यास भाग पाडलं. आरोपीने यानंतर पीडित मुलीशी फोनवरुन संवाद साधला. एक दिवस आरोपीने पीडितेला आपल्या सलूनच्या दुकानात बोलवून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.

घाबरलेल्या मुलीने ही गोष्ट आपल्या दौन मैत्रिणींना सांगितल्यानंतर दोघींनीही काहीही होत नाही म्हणून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. यानंतरही आरोपी भूषण थांबला नाही, त्याने पुन्हा एकदा पीडित मुलीला गळ घालून आपल्याला भेटायला भाग पाडलं. यावेळी त्याने स्थानिक भागात असलेल्या शाळेच्या एका खोलीत नेऊन तिच्यावर बलात्कार केला. ज्यावेळी पीडित मुलगी रडायला लागली त्यावेळी आरोपीने तिला सॉरी म्हणून काहीही होणार नाही असं सांगितलं. इतकच नव्हे तर या प्रकरणाबद्दल कुठेही वाच्यता केलीस तर तुझ्या भावाला मारुन टाकेन अशीही धमकी दिली.

भीतीमुळे पीडित तरुणीने आपल्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल घरात कोणालाही माहिती दिली नाही. यानंतर भूषणने पुन्हा एकदा पीडित मुलीला भेटायला बोलावलं. यावेळी मुलीने भेटण्यासाठी नकार दिल्यानंतर भूषणने तिला तुझे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेन अशी धमकी दिली. यानंतर नाईलाजास्तव पीडित मुलगी आरोपीला भेटण्यासाठी गेली असता भूषणने आपल्या मित्राच्या घरी पीडित मुलीवर पुन्हा बलात्कार केला. यानंतर हा अत्याचार सहन न झाल्यामुळे ही बाब पीडितेने घरी सांगितली.

तक्रार दाखल झाल्यानंतर मलकापूर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत आरोपी भूषण बोरसेला अटक केली आहे. त्याच्यावर POSCO आणि इतर कलम लावण्यात आली आहेत. याचसोबत पीडित मुलीच्या दोन मैत्रिणींवरही गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

    follow whatsapp