नागपूर शहरातील सोनेगाव पोलीस ठाण्याच्या अटकेत असलेला एक आरोपी हॉस्पिटलमधून पळून गेला आहे. चोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या या आरोपीचा सध्या शोध घेतला जातोय. अटक करण्यात आल्यानंतर आरोपीची प्रकृती खालावल्यामुळे त्याला नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.
ADVERTISEMENT
संसार सुरळीत चालू रहावा यासाठी चोरीचा मार्ग स्विकारलेल्या पंकज उरकुडे या आरोपीला सोनेगाव पोलिसांनी अटक केली होती. या आरोपीकडून पोलिसांनी कार, लॅपटॉप, महागडे मोबाईल आणि दीड लाख रुपये रोख रक्कम हस्तगत केली होती. अटक केल्यानंतर अवघ्या एका दिवसातच त्याची तब्येत बिघडल्यामुळे पोलिसांनी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.
दरम्यान आरोपी पळून गेल्याचं कळताच नागपूर पोलिसांची चांगलीच धावपळ झाली आहे. या आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी पथकांची स्थापना करुन पुन्हा एकदा शोध सुरु केला आहे. परंतू या घटनेमुळे नागपूर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न विचारला जात आहे.
संसार सुरळीत चालवण्यासाठी तो चोर बनला, नागपूर पोलिसांनी केली अटक
ADVERTISEMENT