नालासोपाऱ्यात एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून संतोष भुवन परिसरात राहणाऱ्या एका विवाहीत जोडप्यावर चाकुने हल्ला केला आहे. या हल्ल्यात अमित मिश्रा आणि ज्योती मिश्रा हे पती-पत्नी जखमी झाले आहेत. या प्रकारानंतर आरोपी घटनास्थळावरुन फरार झाला आहे.
ADVERTISEMENT
शुक्रवारी रात्री हा प्रकार घडला. आरोपीने हल्ला करताना पती-पत्नीने केलेल्या आरडाओरडीमुळे शेजारच्या व्यक्तींना या प्रकाराबद्दल कळलं. यानंतर शेजारच्यांनी पती-पत्नीला सरकारी रुग्णालयात दाखल केलं. परंतू दोघांच्याही गळ्यावर चाकुचे वार झाल्यामुळे यानंतर त्यांना नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
चिडवलं म्हणून 5 वर्षाच्या मुलाची हत्या; 11वीतल्या विद्यार्थ्याचं रागाच्या भरात कृत्य
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहीत जोडपं काही आठवड्यापूर्वीच नालासोपारा भागात रहायला आलं होतं. आरोपीने हल्ला करण्याआधी जोडप्याच्या घराची रेकी करुन नंतर हा हल्ला केल्याचं कळतंय. तुळींज पोलिसांनी आरोपीविरुद्ध IPC 307 आणि 326 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.
पिंपरी चिंचवडमधील काटे पुरम चौकात भरदिवसा गोळीबार; सीसीटीव्हीत कैद झाली घटना
ADVERTISEMENT