कल्याणमध्ये अज्ञात चोरट्यांनी घरात शिरुन दोन महिलांना मारहाण करत घरातले दागिने आणि रोकड पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात खडकपाडा पोलीसांना गुन्हा दाखल केला असून जखमी मायलेकींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
ADVERTISEMENT
गेल्या काही दिवसांपासून कल्याण-डोंबिवली परिसरात घरफोडी, चेन स्नॅचिंग अशा गुन्ह्यांमध्ये वाढ होते आहे. कल्याणनजीक असलेल्या आटाळी भागात हा प्रकार घडला. या गावात राहणाऱ्या वत्सला चिकणे यांनी आपल्या घरी माघी गणेशाची स्थापना केली होती. यासाठी वत्सला यांची मुलगी सारिका चव्हाण आपल्या दोन मुलांसह घरी राहण्यासाठी आली होती.
गणेश विसर्जनानंतर रात्री घरात सर्व झोपले असताना, रात्री वत्सला यांना जाग आली. यावेळी घरात दोन चोरटे शिरल्याचं त्यांना लक्षात आलं. त्यांना पाहताच वत्सला यांनी आरडाओरड सुरु केली. हे पाहताच चोरट्यांनी वत्सला यांना मारहाण केली. या सर्व गडबडीत मुलगी सारिकाला जाग आली. ती प्रतिकार करायला गेली असता चोरट्यांनी तिलाही मारहाण करत अंगावरील दागीने आणि रोखरक्कम घेऊन पोबारा केला.
मुलुंडमध्ये पडलेल्या दरोड्याचा यशस्वी तपास, ८ आरोपी अटकेत; ३७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
या घटनेनंतर खडकपाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
डोंबिवली : 6 महिन्यांपूर्वी मृत्यू झालेल्या चिमुकलीचा मृतदेह काढला बाहेर, कारण…
ADVERTISEMENT