माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत काम करणाऱ्या अभिनेत्री धनश्री भालेकरची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. वेब सीरिजमध्ये काम देतो असं सांगून तिच्याकडून 22 हजार 368 रूपये उकळण्यात आले आहेत. शिव आणि अनिकेत या दोघांनी तिची फसवणूक केली आहे. त्यांच्या विरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक इंस्टाग्राम पोस्टवर व्हीडिओ शेअर करून तिने तिचा अनुभव सांगितला आहे.
ADVERTISEMENT
काय आहे प्रकरण?
कास्टिंग बालाजी टेलिफिल्म्स डॉट कॉम या इमेल आयडीवरून मला वेब सीरिजसाठी सिलेक्शन झाले असा मेल आला होता. माझ्याबाबतची माहिती टॅलेंट ट्रॅक ह्यांच्याकडून मिळाली असं मला सांगण्यात आले. बालाजी टेलिफिल्म्स असल्याने धनश्रीने या गोष्टीवर विश्वास ठेवला. मुंबई आणि हैदराबाद येथे या वेबसिरीजचे शूटिंग होणार आणि ते झी 5 वर दिसणार असं सांगण्यात आले होतं. त्यासाठी डॉक्युमेंटस पाठवून मला मुंबई ऑफिसला जावे लागेल असे सांगितलं. परंतु मुंबई ऑफिस बंद पडत असल्याने ह्याची प्रोसेस हैद्राबादलाच होईल असे तिला कळवण्यात आले. हैद्राबादला विमानाने येण्यासाठी ‘बालाजी २०’ असा एक प्रोटोकॉल तिला दिला गेला आणि तिकीट बुक करण्यासाठी सांगितले. याआधीही मी असे प्रोजेक्ट्स केले होते त्यामुळे मला सुरूवातीला याबाबत काहीच शंका आली नाही. परंतु तिकीट बुक करायच्या वेळेस प्रोसेस होत नसल्याचे तिने त्यांना कळवले. इंडिगोकडून तिकीट बुक केले आहे मात्र त्याचे पेमेंट पेंडिंग आहे असा एक रेकॉर्ड कॉल मला आला.
त्यानंतर मला एक नंबर पाठवून २२ हजार ३४८ रुपये एवढी विमानाच्या तिकीटाची रक्कम गुगल पे करण्यास सांगितली.९ फेब्रुवारी २०२२ रोजी गुगलपे करताना स्क्रीनवर इंडिगोच नाव समोर आलं आणि तुमची सीट बुक झाली असा एक मेल मला आला. मात्र ह्या प्रोसेस मध्ये काही वेळ जाईल असं मला सांगण्यात आले. १० फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजताची फ्लाईट होती त्यामुळे ही प्रोसेस लवकर कन्फर्म व्हावी अशी मागणी तिने केली होती. आदल्या दिवशी रात्री ८ वाजेपर्यंत मी त्यांच्याशी पुन्हा संपर्क साधला असता कुठलाच प्रतिसाद न मिळाल्याने तिची फसवणूक झाली असल्याचे तिला वाटले.
धनश्री यांनी अनेकदा शीव आणि अनिकेत यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडून धनश्री यांना कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीच्या आधारे कळवा पोलीस ठाण्यात शीव आणि अनिकेत नावाच्या व्यक्तीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा तपास कळवा पोलिसांकडून सुरू असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
ADVERTISEMENT