ADVERTISEMENT
मलायका अरोरा ही आपल्या ड्रेसिंग सेन्समुळे नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री आहे.
अनेकदा मलायका आपल्या कपड्यांमुळे अनेक ट्रोल देखील होते.
यावेळी तिने एका मुलाखतीत अतिशय स्पष्टपणे आपलं मत व्यक्त करत ट्रोलर्सला फटकारलं आहे.
मलायकाने म्हटलं की, ‘महिला नेहमी या आपल्या स्कर्टची लांबी आणि नेकलाइनच्या खोलीमुळे जज केल्या जातात.’
लोकं माझ्या नेकलाइन आणि माझ्या कपड्यांबाबत काय बोलतात याचा मी फारसा विचार करत नाही. मी माझं आयुष्य माझ्या पद्धतीने जगते. असं मलायकाने ट्रोलर्सला ठणकावून सांगितलं आहे.
मलायका पुढे असंही म्हणाली की, ड्रेसिंग ही खूपच खासगी निवड आहे. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आवडीप्रमाणे कपडे आवडतात.
माझी स्वत:ची अशी एक आवड आहे. त्यामुळे कोणालाही मला त्यावरुन काहीही बोलण्याचा हक्क नाही.
मलायका ही बॉलिवूडमध्ये आयटम नंबर्ससाठी खास ओळखली जाते.
ती छय्या, छय्या.. माही वे, काल धमाल आणि मुन्नी बदनाम हुई या सारख्या अनेक डान्स नंबरवर थिरकली आहे.
ADVERTISEMENT