मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापनाचा ताबा जीव्हीके कंपनीकडून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापनाचा ताबा आता जीव्हीके कंपनीकडून अदानी समूहाने घेतला आहे. याबाबतचं निवेदन कंपनीने प्रसिद्ध केलं आहे. जीव्हीके आणि अदानीमधील कराराला भारतीय विमानतळ प्राधिकरणाने हिरवा कंदिल दिला होता. इतर खात्यांकडून अद्याप यासाठी मंजुरी मिळणं बाकी होतं. आता त्याला मंजुरी मिळाल्याने व्यवस्थापनाचा ताबा घेण्यात आला. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये अदानी समूहाने जीव्हीके ग्रुपसोबत करार केला होता. त्यानुसार जीव्हीकेच्या नावे 50.5 टक्के वाटा अदानी समूहाच्या नावे करण्यात येण्याचं निश्चित झालं होतं. त्याप्रमाणे कंपनीने मुंबई विमानतळामध्ये वाटा असणाऱ्या दोन दक्षिण अफ्रिकन कंपन्यांशी करार करून त्यांच्याकडी 23.5 टक्के आपल्या नावावार करण्याचा करार केला होता. मुंबई विमानतळ आणि मालवाहतूक करणारं देशातील दुसरं व्यस्थ विमानतळ आहे.
ADVERTISEMENT
विमानतळ पर्यावरणस्नेही करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे विमानतळ परिसरात संबंधित व्यवसायांना चालना देण्यासाठी प्रयत्न करू. यामध्ये मनोरंजन, ई-कॉमर्स यासारख्या संकल्पनांचा समावेश आहे. असं अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी एका निवेदनात म्हटलं आहे.
मार्च 2019 मध्ये बिडवेस्टचे 13.5 टक्के वाटा अदानी समूहाला विकण्यासाठी एक हजार 248 कोटींचा करार केला होता. जीव्हीकेकडून वाटा ताब्यात घेण्याची लढाई थेट न्यायालयापर्यंत गेली होती. तेव्हा जीव्हीकेने आपल्या विमानतळामधील 79 टक्के वाटा विकून पैसे उभे करण्याचा प्रयत्न केला. तरी सीबीआयची चौकशी आणि इतर कायदेशीर बाबींमुळे जीव्हीके समूहाला पैसा उभं करणं जमलं नाही. अखेर कर्जाचा वाढते ओझे आणि इतर बाबी लक्षात घेत अदानींनाच हा वाटा विकण्यासाठी जीव्हीकेला राजी व्हावं लागलं.
जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ, तिरुअनंतपुरममधील त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि गुवाहाटीमधील लोकप्रिय गोपीनाथ बोर्डोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळांची देखभाल करण्याचे हक्क अदानी समूहाला देण्यात आले आहेत. लखनऊमधील चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ, अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ, बंगळूरू आंतरराष्ट्रीय विमानतळाचे हक्कही अदानी समूहाला विकण्यासंदर्भात 2009 साली फेब्रुवारी महिन्यातच करार झाला होता. लखनौ, अहमादबाद आणि मंगळूरु विमानतळासंदर्भात भारतीय विमानतळ प्राधिकरणाला सवलत देण्याच्या करारावर अदानी समूहाने 14 फेब्रुवारी 2020 रोजी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या विमानांचे खासगीकरण केल्याने फायदा होणार असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.
ADVERTISEMENT