गेल्या काही दिवसांपासून तामिळनाडू दौऱ्यावर असलेले काँग्रेसचे खासदार राहुल गांधी प्रत्येक दिवशी आपलं नवीन रुप सोशल मीडियावर आणत आहेत. काही दिवसांपूर्वी मच्छीमार बांधवांसोबत समुद्रात उतरलेल्या राहुल गांधींचा Boxer Abs चा व्हिडीओ समोर आला होता. यानंतर तामिळनाडूतील एका शाळेच्या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी चक्क उपस्थित विद्यार्थ्यांसोबत पुश अप्स करुन सर्वांचं मन जिंकलं.
ADVERTISEMENT
तामिळनाडूच्या मुलागुम्बूदुबन येथील सेंट जोसेफ शाळेच्या एका कार्यक्रमात राहुल गांधी हजर होते. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना राहुल यांनी एका मुलाला मार्शल आर्टमधील ‘एकीडू’ प्रकार शिकवत नंतर त्याच्यासोबत पुशअप्सही काढल्या.
एका मिनीटीच्या आतच राहुल गांधी यांनी १३ पुशअप्स मारल्या. राहुल गांधीना पुशअप्स मारताना पाहिल्यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांनीही जोरदार टाळ्या वाजवत राहुल गांधींचं कौतुक केलं.
केरळमधील वायनाडचे खासदार असलेले राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून तामिळनाडू दौऱ्यावर आहेत. तामिळनाडूत आगामी निवडणुकांच्या दृष्टीकोनातून राहुल गांधी यांचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे.
ADVERTISEMENT