अजित पवारांनी मुद्दा मांडताच पोलीस ॲक्शनमध्ये; 12 तासांत कोयता गँगच्या आवळल्या मुसक्या

मुंबई तक

21 Dec 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 09:20 AM)

(Ajit Pawar on Koyata gang News) पुणे : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मंगळवारी दुपारी हिवाळी अधिवेशनात कोयता गँगचा मुद्दा उपस्थित करताच पोलिस अॅक्शनमध्ये आले आहेत. बारामती पोलिसांनी अवघ्या १२ तासांत (मंगळवारी रात्री उशीरा) या टोळीतील पाच जणांना अटक केली. दोन दिवसांपूर्वीच कोयता गँगने दारूच्या नशेत बारामतीतील विविध भागात दहशत निर्माण केली होती. बारामतीतील घटनेनंतर […]

Mumbaitak
follow google news

(Ajit Pawar on Koyata gang News)

हे वाचलं का?

पुणे : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मंगळवारी दुपारी हिवाळी अधिवेशनात कोयता गँगचा मुद्दा उपस्थित करताच पोलिस अॅक्शनमध्ये आले आहेत. बारामती पोलिसांनी अवघ्या १२ तासांत (मंगळवारी रात्री उशीरा) या टोळीतील पाच जणांना अटक केली. दोन दिवसांपूर्वीच कोयता गँगने दारूच्या नशेत बारामतीतील विविध भागात दहशत निर्माण केली होती.

बारामतीतील घटनेनंतर पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी दोन पथके रवाना केली होती. त्यानंतर मंगळवारी रात्री उशीरा या टोळीतील पाच जणांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं. हातात कोयता घेऊन वाहनांची तोडफोड करणे, महिलांचे दागिने लुटणे, चोरी करणे, जेवणाचं बिल न भरता हॉटेलमध्ये तोडफोड करण्यासारखे हिंसक प्रकार ही गँग करत असल्याच्या मुद्द्याकडे अजित पवार यांनी विधानसभेत लक्ष वेधलं होतं.

काय म्हणाले होते अजित पवार?

पुण्यासह राज्याच्या अनेक शहरे आणि उपनगरात कोयता गँगची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. या गँगकडून परिसरातील नागरिकांच्या गाड्यांच्या काचा फोडून नुकसान केलं जात आहे. भरदिवसा हातात कोयते घेऊन दहशत निर्माण केली जात आहे. महिलांना दमदाटी केली जात आहे. महिलांचे दागिने लुटणे, चोरी करणे हे प्रकार सुरु आहेत. हे गुंड हॉटेलमध्ये खातात; पण त्याचे पैसे देत नाहीत.

अशा घटनांचं प्रमाण सातत्यानं राज्याच्या शहरी भागात मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. या प्रकरणी पकडण्यात आलेल्यांपैकी अनेक जण कॉलेजचे विद्यार्थी आहेत. ती सोशल मीडियाच्या आहारी गेल्याचंही लक्षात आलं आहे. सोशल मिडियावर काहीतरी बघायचं, चित्रपट पाहायचे, नशा करायची आणि अशा प्रकारे गोंधळ घालायचे. यामुळे पोलिसांनी ‘कोयता गँग’ ची दहशत मोडून काढणं गजरेचं आहे. यातील गुन्हेगारांवर ‘मक्को’ लावावा, त्यांना तडीपार करून कडक कारवाई करावी, अशीही मागणी पवारांनी केली होती.

    follow whatsapp