हिंदी चित्रपट आणि प्रामुख्याने टेलिव्हीजन इंडस्ट्रीतला प्रख्यात अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं आज निधन झालं. सिद्धार्थ शुक्लाच्या निधनामुळे सध्या मनोरंजन क्षेत्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बालिका वधू आणि बिग बॉस या दोन शो च्या माध्यमातून घराघरांत पोहचलेल्या सिद्धार्थचं असं अकाली जाणं त्याच्या चाहत्यांसह सर्वांसाठीच धक्कादायक आहे.
ADVERTISEMENT
बिग बॉस या कार्यक्रमात सिद्धार्थ शुक्ला आणि शेहनाझ गिल यांची जोडी चांगलीच गाजली होती. शो दरम्यान या दोघांनी केमिस्ट्री, त्यांच्यातली होणारी भांडणं, रुसवे-फुगवे या सर्वांमुळे अनेकांना ही जोडी आवडायला लागली होती. सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर शेहनाझ गिलनेही आपलं सुरु असलेलं शुटींग तात्काळ थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सिद्धार्थ काही औषधं घेऊन झोपला मात्र सकाळी तो उठलाच नाही. त्यामुळे सिद्धार्थला तातडीने रूग्णालयात नेण्यात आलं, मात्र रूग्णालयात पोहचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. कूपर रूग्णालयात सिद्धार्थला नेण्यात आलं होतं. मात्र रूग्णालयाने त्याला मृत घोषित केलं. सिद्धार्थच्या नातेवाईकांनी ही माहिती दिली आहे.
Hospital मध्ये दाखल करण्याआधीच Sidharth Shukla ने घेतला अखेरचा श्वास, कूपर रूग्णालयाची माहिती
मॉडेलिंगच्या क्षेत्रातून सिद्धार्थने आपल्या करिअरला सुरुवात केली होती. यानंतर बाबुल का आंगन छुँटे ना या मालिकेतून त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. याव्यतिरीक्त सिद्धार्थचे जाने पेहचाने से, ये अजनबी, लव्ह यू जिंदगी, बालिका वधू हे शो देखील खूप गाजले. बिग बॉसच्या तेराव्या पर्वाचं सिद्धार्थ शुक्लाने विजेतेपद पटकावलं होतं. सिद्धार्थ आपल्या फिटनेसबाबत नेहमीच सजग असायचा…त्यामुळे अशा अभिनेत्याच्या अकाली निधनामुळे सर्वच स्तरातून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
Sidharth Shukla: कोण होता सिध्दार्थ शुक्ला, कसं होतं त्याचं करिअर?
ADVERTISEMENT