देशभरात नुकत्याच पाच राज्यांच्या निवडणुका पार पडल्या. यात सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या पक्षाने बाजी मारली. याव्यतिरीक्त तामिळनाडूत द्रमुक, केरळमध्ये डाव्या पक्षाचं, आसाममध्ये भाजपचं सरकार आलं आहे. परंतू या निवडणुकीत काँग्रेसला म्हणावी तशी कामगिरी करता आलेली नाही. निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर AICC ने काँग्रेसच्या कामगिरीची समीक्षा करण्यासाठी एका समितीची स्थापना केली असून महाराष्ट्राचे अशोक चव्हाण या समितीचं नेतृत्व करणार आहेत.
ADVERTISEMENT
के.सी.वेणुगोपाल यांनी या समितीची घोषणा केली असून अशोक चव्हाणांव्यतिरीक्त वरिष्ठ नेते सलमान खुर्शीद, माजी केंद्रीय मंत्री मनिष तिवारी, व्हिन्सेंट पाला, खासदार ज्योती मणी यांचाही या समितीत समावेश असणार आहे. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील ही समिती या पाचही राज्यांच्या निकालाचे विवेचन करून पुढील १५ दिवसांत आपला अहवाल अखिल भारतीय काँग्रेस कमिटीला सादर करेल.
या नवीन जबाबदारीसह महाराष्ट्रातल्या आणखी एका नेत्यावर काँग्रेस पक्षाने देशपातळीवरची जबाबदारी टाकली आहे. दरम्यान अशोक चव्हाण यांनीही या जबाबदारीबद्दल सोनिया गांधी यांचे आभार मानले असून, संबंधित राज्यांमधील उमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी बोलून अहवाल सादर करु असं म्हटलं आहे.
मराठा आरक्षणाचं नेमकं काय होणार? वाचा अशोक चव्हाण यांनी काय दिलं उत्तर…
ADVERTISEMENT