lalbaugcha Raja: अनंत मंडळात येताच अंबानींकडून 'लालबागच्या राजा'चरणी 20 किलोचा सोन्याचा मुकूट

Anant Ambani Latest News : मुंबईत लागबागच्या राजाचं मोठ्या जल्लोषात आगमन झालं आहे. संपूर्ण जगभरात ख्याती असलेल्या लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने यंदाही जय्यत तयारी केली आहे. मयूरासनावर विराजमान झालेल्या लागबागच्या राजाच्या दर्शनाची तमाम गणेशभक्त आतुरतेने वाट पाहत आहेत.

lalbaugcha Raja 20 KG Gold Crown

lalbaugcha Raja 20 KG Gold Crown

मुंबई तक

• 02:52 PM • 06 Sep 2024

follow google news

बातम्या हायलाइट

point

अंबानी कुटुंबाकडून 20 किलोचा सोन्याचा मुकूट लालबागच्या चरणी

point

लालबागचा राजा मंडळाकडून अनंत अंबानींना दिली मोठी जबाबदारी

point

लालबागच्या राजाचा 91 वा उस्तव दिमाखात होणार साजरा

Anant Ambani Latest News : मुंबईत लागबागच्या राजाचं मोठ्या जल्लोषात आगमन झालं आहे. संपूर्ण जगभरात ख्याती असलेल्या लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने यंदाही जय्यत तयारी केली आहे. मयूरासनावर विराजमान झालेल्या लागबागच्या राजाच्या दर्शनाची तमाम गणेशभक्त आतुरतेने वाट पाहत आहेत. बाप्पाच्या आगमनावेळी गणेशभक्तांनी गणपती बाप्पा मोरया अशा घोषणांचा जयघोष केला होता.भाविकांनी लालबागच्या राजाचं सोशल मीडियावर लाईव्ह दर्शनही घेतलं आहे. मोबाईलमध्ये बाप्पाची झलक सेव्ह करण्यासाठी लालबाग परिसरात गणेशभक्तांनी गर्दी केली होती. अशातच प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कुटुंबीयांकडून लालबागच्या राजाला 20 किलोचा सोन्याचा मुकूट अर्पण करण्यात आला आहे. 

हे वाचलं का?

अनंत-राधिका यांचा शाही विवाह सोहळा पार पडल्यानंतर अंबानी कुटुंबासाठी हा पहिलाच गणेशोत्सव आहे. अंबानी कुटुंब दरवर्षी लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होऊन बाप्पाचं आशीर्वाद घेतात. यंदा मयुरासनावर विराजमान झालेल्या लालबागच्या राजाने सोन्याचा मुकूट परिधान केला आहे. हा मुकूट अंबानी कुटुंबाकडून अर्पण करण्यात आला आहे. हा मुकूट 20 किलो वजनी असून त्याची किंमत 15 कोटी रुपये आहे. या सोन्याच्या मुकूटमुळे बाप्पाची मूर्ती अधिक आकर्षक आणि सुबक झाली आहे. 

हे ही वाचा >> Virat Kohli: सर्वाधिक कर भरणाऱ्यांमध्ये कोहलीची 'विराट' झेप! मैदानात पाडलाय पैशांचा पाऊस, नेटवर्थ पाहून थक्कच व्हाल

अनंत अंबानींकडे लालबागचा राजा मंडळाची मोठी जबाबदारी 

रिलायन्स उद्योग समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांच्याही खांद्यावर मंडळाची मोठी जबाबदारी देण्यात आलीय. अवघ्या काही तासांनंतर गणेशोत्सवाला प्रारंभ होणार आहे.  याच पार्श्वभूमीवर अनंत अंबानी यांना लागबागचा राजा मंडळाकडून अत्यंत महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली..

हे ही वाचा >> lalbaugcha Raja : अनंत अंबानींवर 'लालबागचा राजा' मंडळाची मोठी जबाबदारी, 'या' पदावर नियुक्ती का केली?

या सभेत अनंत अंबानी यांना प्रमुख जबाबदारी देण्याच्या प्रस्तावाला एकमताने मंजुरी देणयात आली. यानुसार, अनंत अंबानी यांना मानद सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.दरवर्षी अंबानी कुटुंब भक्तीभावाने लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येतात. या कुटुंबीयांचा गणपती बाप्पासाठी असलेला सेवाभाव पाहून त्यांचाही समावेश मंडळाच्या कार्यकारिणीत करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.
 

    follow whatsapp