Celebrity Advance Tax Payment : फॉर्च्यून इंडियाने देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली होती. त्यानंतर आता पुन्हा एक मोठी अपडेट समोर आली आहे. देशात सर्वाधिक कर भरणाऱ्या सेलिब्रिटींची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये बॉलिवूडच्या दिग्गजांसह स्टार क्रिकेटर्सच्या नावांचा समावेश आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार एम एस धोनीसह विराट कोहलीच्या नावाचाही या यादीत उल्लेख करण्यात आला आहे. तर शाहरूख खान, सलमान खानसारख्या दिग्गज अभिनेतेही कर भरण्याच्या शर्यतीत अव्वल स्थानावर आहेत.
ADVERTISEMENT
बॉलिवूडचे 'हे' दिग्गज सर्वात पुढे
फॉर्च्यून इंडियाच्या नवीन लिस्टनुसार, बॉलिवूडचा किंग शाहरूख खान देशातील सर्वाधिक कर भरणारा सेलिब्रिटी ठरला आहे. शाहरुखने FY24 मध्ये एकूण 92 कोटींचा कर भरला आहे. त्यानंतर सुपर स्टार विजय थालापती 80 कोटी रुपयांचा कर भरून दुसऱ्या स्थानावर आहे.
हे ही वाचा >> lalbaugcha Raja : अनंत अंबानींवर 'लालबागचा राजा' मंडळाची मोठी जबाबदारी, 'या' पदावर नियुक्ती का केली?
क्रिकेटर्सच्या दिग्गजांमध्ये विराट कोहली सर्वात पुढे
फॉर्च्यून इंडियाच्या माहितीनुसार, क्रिकेटविश्वातील दिग्गजांच्या तुलनेत भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीनं सर्वाधिक कर भरला आहे. विराट कोहलीने चालू आर्थिक वर्ष 2024 मध्ये 66 कोटी रुपयांचा आगाऊ कर भरला आहे. रिपोर्ट्सनुसार, विराट कोहलीचा नेटवर्थ जवळपास 1018 कोटी रुपये आहे. क्रिकेटसोबतच गुंतवणूक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून विराट कोहली कोट्यावधी रुपयांची कमाई करत आहे.
धोनी-सचिननेही भरला इतका टॅक्स
विराट कोहलीनंतर महेंद्रसिंग धोनीचा यात समावेश करण्यात आला आहे. गतवर्षी धोनीनं एकूण 38 कोटी रुपयांचा आगाऊ कर भरला होता. महेंद्र सिंग धोनीचा नेटवर्थही 1000 कोटींच्या आसपास असल्याचं सांगितलं जात आहे. धोनीनंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सर्वाधिक कर भरला आहे. सचिनने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 28 कोटी रुपये कर भरला होता. सचिनचा नेटवर्थ 1400 कोटी रुपयांहून अधिक आहे.
हे ही वाचा >> Today Horoscope : या' राशीच्या लोकांना मिळणार गुड न्यूज! जाणून घ्या आजचं राशी भविष्य
सौरव गांगुलीसह या क्रिकेटर्सचाही लिस्टमध्ये समावेश
फॉर्च्यून इंडियाच्या सेलिब्रिटी टॅक्स पेयर लिस्टमध्ये आणखी काही क्रिकेटर्सच्या नावांचा समावेश आहे. यामध्ये भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली 23 कोटी रुपयांचा कर भरून चौथ्या स्थानावर आहे. त्यानंतर हार्दिक पंड्याच्या नावाचा समावेश आहे. हार्दिकने 13 कोटींचा कर भरला आहे. त्यानंतर रिषभ पंतने चालू आर्थिक वर्षात 10 कोटी रुपयांचा कर भरला आहे.
ADVERTISEMENT
