सूक्ष्म आणि लहान यामध्ये काय निधी मिळणार? निधी हवा असेल तर गडकरींकडे असलेलं खातं महत्त्वाचं आहे असं म्हणत नारायण राणे यांना मिळालेल्या खात्यावर अजित पवार यांनी टोला लगावला आहे. अनिल परब यांचं रेकॉर्डिंग समोर आलं असता त्याबाबत मला थेट काही भाष्य करता येणार नाही. पालकमंत्री म्हणून जे योग्य असेल ते आदेश मिळाले असतील असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. नारायण राणे यांनी जे भाष्य केलं त्यानंतर अटकेची कारवाई झाली. त्यांना राज्यात फिरायला सांगितलं आहे हे मान्य आहे पण त्यांनी जपून बोललं पाहिजे होतं असंही मत अजित पवार यांनी व्यक्त केलं.
ADVERTISEMENT
नारायण राणे यांच्यावर लगेच कारवाई झाली नाही हे लक्षात घ्या. कोर्टाने सांगितल्यावर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. सगळ्या राजकीय पक्षांना माझं आवाहन आहे की सुसंस्कृत राजकारण करण्याचं भान ठेवलं पाहिजे असंही अजित पवार यांनी सांगितलं. पुण्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठकीसाठी अजित पवार आले होते. त्यावेळी पुण्यात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सुरू झाल्यापासूनच चर्चेत आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर जामीनही मिळाला. याबाबत आज आढावा बैठकीसाठी पुण्यात आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी प्रत्येक पक्षाने सुसंस्कृत राजकारण केलं पाहिजे असं आवाहन केलं आहे.
आणखी काय म्हणाले अजित पवार?
येणाऱ्या काळात सण येत आहेत. मात्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका आहे. राज्यात 700 मेट्रिक टनपेक्षा जास्त ऑक्सिजन लागला तर मात्र कठोर निर्णय घ्यावे लागतील. सध्या आपल्याला 200 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासते आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड या ठिकाणी लसीकरण करण्यास प्राधान्य दिलं जाणार आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.
दुसरी लाट ओसरू लागली तरीही तिसऱ्या लाटेच्या धोक्याची घंटा आहे. त्याचा विचार करून प्रत्येकाने काळजी घेणं आवश्यक आहे. त्यामुळे तिसरी लाट येण्याआधी लसीकरण जास्तीत जास्त कसं होईल याकडे लक्ष दिलं जाणार आहे असंही अजित पवार म्हणाले.
ओबीसी आरक्षणाबाबत काय म्हणाले अजितदादा?
महापालिका निवडणुकीत बाबत मुख्यमंत्री यांनी सगळयाची बैठक बोलवली होती.सगळयाच म्हणणं ऐकून घेतलं.सगळ्याच मत आहे की ओबीसी आरक्षण बाबत निंर्णय होत नाही.जो ओबीसीवर अन्याय झाला आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षण होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नये अस सर्वपक्षीय नेत्याच मत आहे.
ADVERTISEMENT