NCP माजी आमदार विद्या चव्हाण यांना अमृता फडणवीसांची मानहानीची नोटीस, जाणून घ्या काय आहे प्रकरण…

मुंबई तक

• 12:48 PM • 07 Jan 2022

भाजप IT सेलच्या प्रमुखाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचा महाराष्ट्राच्या राबडीदेवी असा केलेला उल्लेख सध्या चांगलाच चर्चेत आहे. या मुद्द्यावरुन भाजप विरुद्ध महाविकास आघाडी सरकार हा सामना पुन्हा एकदा रंगायला सुरुवात झाली आहे. टीव्ही चॅनलवर बोलत असताना राष्ट्रवादीच्या माजी आमदार विद्या चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांना […]

Mumbaitak
follow google news

भाजप IT सेलच्या प्रमुखाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचा महाराष्ट्राच्या राबडीदेवी असा केलेला उल्लेख सध्या चांगलाच चर्चेत आहे. या मुद्द्यावरुन भाजप विरुद्ध महाविकास आघाडी सरकार हा सामना पुन्हा एकदा रंगायला सुरुवात झाली आहे.

हे वाचलं का?

टीव्ही चॅनलवर बोलत असताना राष्ट्रवादीच्या माजी आमदार विद्या चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांना उद्देशून केलेल्या वक्तव्यानंतर अमृता फडणवीस यांनी थेट मानहानीची नोटीस पाठवली आहे.

‘महाराष्ट्राच्या राबडीदेवी’ असं रश्मी ठाकरेंना भाजपने संबोधलं, शिवसेनेचा तिळपापड का होतो आहे?

अमृता फडणवीस यांनी आपल्या वकीलांमार्फत विद्या चव्हाण यांना पाठवलेली नोटीस आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केली आहे. या नोटीशीत दिलेल्या उल्लेखाप्रमाणे विद्या चव्हाण यांनी टीव्ही वर बोलत असताना अमृता फडणवीस यांचा उल्लेख डान्सिंग डॉल असा केल्याचा आरोप अमृता फडणवीस यांनी केला आहे.

आपल्या नोटीसीमध्ये पुढे जाऊन अमृता फडणवीस यांनी विद्या चव्हाण यांना, ४८ तासांत पत्रकार परिषद घेऊन माफी मागण्यास सांगितलं आहे. आपण केलेली वक्तव्य ही पूर्णपणे निराधार असून आपण ती मागे घेत असल्याचं विद्या चव्हाण यांनी जाहीर करावं. असं न केल्यास, त्यांच्याविरुद्ध IPC 499, 500 अंतर्गत गुन्हा दाखल करुन मानहानीचा खटला दाखल करण्याची तयारी अमृता फडणवीस यांनी दाखवली आहे.

त्यामुळे विद्या चव्हाण आता या नोटीशीला काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

या सगळ्या चर्चेला तोंड फोडलं होतं ते भाजप आमदार नितेश राणे यांनी. नितेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी सोनी लिव्ह वरील महारानी या वेबसीरिजचं पोस्टर ट्विट केलं आणि महाराष्ट्रावर अशी वेळ येऊ नये असं म्हटलं होतं. या वेब सीरिजमध्ये बिहारचे मुख्यमंत्री आजारी होतात आणि मग त्यांच्या पत्नीला मुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागतं. ही वेबसीरिज राबडीदेवींवर बेतलेली होती अशीही चर्चा झाली होती. मात्र नितेश राणेंनी हे पोस्टर ट्विट करून अशी वेळ महाराष्ट्रावर येऊ नये म्हटलं होतं.

आजी-माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी, RTO ची रांग आणि व्हायरल झालेली फेसबुक पोस्ट, जाणून घ्या सत्य

    follow whatsapp