अमृता फडणवीस यांनी त्रिशूळ घेतलेला फोटो का पोस्ट केला होता? समोर आलं कारण

मुंबई तक

• 09:21 AM • 23 Feb 2022

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस सोशल मीडियावर चांगल्याच अॅक्टिव्ह असतात. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी त्यांनी एक फोटो ट्विट केला होता. त्यानंतर काही ओळीही लिहिल्या होत्या. ज्यानंतर आता 24 फेब्रुवारीला गाणं येतं आहे. अमृता फडणवीस यांनीच ट्विट करून ही माहिती दिली आहे. अमृता फडणवीसांचे हे नवे गाणे भोलेनाथवर आधारित आहे. हे गाणे […]

Mumbaitak
follow google news

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस सोशल मीडियावर चांगल्याच अॅक्टिव्ह असतात. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी त्यांनी एक फोटो ट्विट केला होता. त्यानंतर काही ओळीही लिहिल्या होत्या. ज्यानंतर आता 24 फेब्रुवारीला गाणं येतं आहे. अमृता फडणवीस यांनीच ट्विट करून ही माहिती दिली आहे.

हे वाचलं का?

अमृता फडणवीसांचे हे नवे गाणे भोलेनाथवर आधारित आहे. हे गाणे अमृता फडणवीसांनी गायले असून शैलेश दाणीने या गाण्याचे बोल लिहिले आहेत. ‘शिव तांडव स्त्रोतम’ असे या गाण्याचे नाव आहे. हे गाणे 24 फेब्रुवारी 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमृता फडणवीसांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. आगामी ‘शिव तांडव स्त्रोतम’ या गाण्याचे पोस्टर रिलीज केले आहे. हे गाणे 24 फेब्रुवारी 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

काय होतं अमृता फडणवीस यांचं ट्विट?

अमृता फडणवीस यांनी आपल्या नव्या ट्विटमधून स्वतःचा पार्वतीच्या रूपातला फोटो शेअर केला आहे. तसंच नवं गाणं हे भगवान शंकरासाठी आणलं जातं आहे असंही स्पष्ट केलं आहे. लॉर्ड शिवा म्हणजेच महादेवाच्या भक्तीवर आधारीत हे गाणं आहे. यातला अमृता फडणवीस यांचा लुक लक्ष वेधून घेतो आहे. भगव्या वस्त्रांमध्ये गळ्यात रुद्राक्षांची माळ घालून आणि हातात त्रिशुळधारी फोटो घेतलेल्या अमृता फडणवीस दिसत आहेत.

मी तुला निवडते आहे आता आणि कायमचे. माझ्या हृदयात, मनात, आत्म्यात, विश्वासात, श्वासात तू आहेस. हा व्हॅलेंटाईन डे जो आपल्या प्रिय व्यक्तीची प्रशंसा करतो.. मी माझ्या रूद्र, लॉर्ड शिवाला म्हणजेज भगवान शंकराला माझी संगीतमय स्तुती अर्पण करत आहे असं अमृता फडणवीस यांनी मह्टलं आहे. त्यामुळे आता त्यांचं नवं गाणं येणार आहे आणि त्यातून त्यांचा नवा लुकही पाहाण्यास मिळणार आहे यात काही शंका नाही. सध्या या अमृता फडणवीस यांच्या या लुकची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

अमृता फडणवीस या कायमच आपल्या वेगवेगळ्या ट्विट्स मुळे चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की मुंबईत ट्रॅफिकमुळे घटस्फोट होतात. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याची चर्चाही झाली होती आणि त्याबद्दल त्यांच्यवर टीकाही झाली होती. तसंच एक गायिका म्हणूनही त्या प्रसिद्ध आहे. गणपतीची गाणीही त्यांनी गायली आहेत. तसंच अमिताभ बच्चन यांच्यासोबत एका अल्बममध्येही त्यांनी काम केलं आहे. आता व्हॅलेंटाईन डेच्या दिवशीचं त्यांचं ट्विट आणि त्यावर लिहिलेल्या ओळी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. तसंच अमृता फडणवीस यांचा वेगळा लुकही चर्चेचा विषय ठरला होता. आता त्याचं कारणही समोर आलं आहे.

    follow whatsapp