Amruta fadnavis latest News : भाजप महिला मोर्चाच्या (BJP Mahila Morcha) प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) आणि अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi javed) यांच्यातील वाद दिवसेंदिवस रंगत चाललाय. उर्फीवर कारवाई करण्याच्या मागणीवर चित्रा वाघ (bjp leader Chitra wagh) ठाम असून, दुसरीकडे उर्फी जावेदकडून चित्रा वाघांची खिल्ली उडवली जात असल्याचं दिसत आहे. या वादावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी भूमिका मांडलीये. (Amruta Fadnavis On urfi javed clothes controversy)
ADVERTISEMENT
तोकडे कपडे परिधान करून सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या ऊर्फी जावेदविरुद्ध चित्रा वाघांनी मोर्चा उघडलाय. गेल्या काही दिवसांपासून चित्रा वाघ सातत्यानं यावर भूमिका मांडत आहे. चित्रा वाघांनी उर्फी जावेदवर कारवाई करण्याची मागणी मुंबई पोलिसांकडेही केली. मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे तक्रारही दिलीये. मात्र, अद्याप ऊर्फीविरुद्ध कोणतीही कारवाई झालेली नाही.
दरम्यान, चित्रा वाघांनी तक्रार केल्यापासून उर्फी जावेद चित्रा वाघांवर टीका करताना दिसत आहे. ट्विट करत उर्फी जावेद चित्रा वाघांना डिवचत आहे. या वादावर भाजप नेत्यांकडून मौन बाळगलं जात असलं, तरी अमृता फडणवीसांनी त्यांची भूमिका स्पष्टपणे मांडलीये.
Urfi: ‘मेरी डिपी इतनी ढासू.. चित्रा मेरी सासू’, चित्रा वाघांना डिवचलं
उर्फी जावेदच्या कपड्यांबद्दल अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
पुण्यात कार्यक्रमानिमित्त आलेल्या अमृता फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना या वादावर भाष्य केलं. अमृता फडणवीस म्हणाल्या, “चित्राताईंनी यावर स्पष्टपणे भूमिका मांडलीये. एक असते प्रोफेशनल गरज. कारण प्रोफेशनल गरजेनुसार सीन करावे लागतात. पण, फक्त मीडियासाठी, प्रकाश झोतात राहण्यासाठी तुम्ही रस्त्यावर फिरले, तर ते मला वाटतं योग्य नाही”, अशी भूमिका अमृता फडणवीसांनी उर्फी जावेदबद्दल मांडलीये.
“उर्फी एक कलाकार आहे. तिनं रस्त्यावर जाताना, सार्वजनिक ठिकाणी जाताना… कारण सार्वजनिक ठिकाणी असे लोक आपल्याला दिसत नाही. रेड कार्पेट असेल, तर असे लोक खूप दिसतात. त्यामुळे कुठे तुम्ही असे कपडे घालता, हे जरुरी आहे असं मला वाटतं”, असं अमृता फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.
Urfi Javed: चित्रा वाघांची कोंडी करणारी उर्फी जावेद आहे तरी कोण?
चित्रा वाघ विरुद्ध उर्फी जावेद : अमृता फडणवीस स्पष्टपणे म्हणाल्या…
महाराष्ट्रात नंगानाच सुरू आहे, असं चित्रा वाघ म्हणाल्या. तुम्हाला वाटतं का महाराष्ट्रात नंगानाच सुरू आहे? या प्रश्नावर अमृता फडणवीस म्हणाल्या, “प्रत्येकाचे विचार असतात. चित्राताईंनी त्यांचे विचार मांडले आहेत. त्यानुसार त्या काम करताहेत.”
‘तात्काळ हिला बेड्या ठोका’; चित्रा वाघ चिडल्या, ऊर्फी जावेदही भडकली
“माझे विचार आहे की, उर्फी जावेद थोडं, जसं की सार्वजनिक ठिकाणी. जिथे प्रोफेशन कमिटमेंट नाहीये, तिथं संस्कृतीच्या हिशोबाने राहिलं तर चांगलं आहे. बाकी मला एक व्यक्ती म्हणून उर्फी… ती एक स्त्री आहे आणि ती स्वतःसाठी काहीतरी करतेय, तर त्यात मला काही वावगं वाटतं नाहीये”, अशी भूमिका अमृता फडणवीस यांनी उर्फी जावेदच्या वेशभूषेबद्दल मांडलीये.
ADVERTISEMENT