कोरोना काळात लॉकडाउनमध्ये महागाईमुळे त्रस्त झालेल्या सामान्य जनतेला आणखी एक फटका बसला आहे. अमूल दूधच्या दरामध्ये १ जुलैपासून प्रति लिटरमागे २ रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे. उद्यापासून देशभरात अमूलच्या उत्पादनांसाठी नवे दर लागू होणार आहेत.
ADVERTISEMENT
अमूल गोल्ड, अमूल शक्ती, अमूल ताजा, अमूल टी-स्पेशल, अमूल स्लिम अँड ट्रीम अशा सर्व उत्पादनांची किंमत २ रुपयांनी वाढलेली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे. दिल्ली, NCR, गुजरात, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि अन्य राज्यांमध्येही अमूलच्या दुधाचे दर वाढणार आहेत.
दीड वर्षांनी अमूलने आपल्या दुधाच्या किमतीमध्ये वाढ केली आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दराचा फटका देशातील दूध व्यवसायाला बसला आहे. त्यातच लॉकडाउन काळात बाजारपेठ बंद-चालू होत असल्यामुळे अनेकदा दूध उत्पादकांना नुकसान सहन करावं लागत आहे.
ADVERTISEMENT