प्रणिती शिंदेंचा भाजपवर निशाणा, नेमकं काय म्हणाल्या काँग्रेस आमदार?

मुंबई तक

• 10:00 AM • 27 Mar 2021

सोलापूर: ‘अधिकारी जेव्हा राज्याच्या गृहमंत्र्यांवर आरोप करतात तेव्हा तो कोणाच्या पाठिंब्याशिवाय होऊ शकत नाही. असे जर आरोप होत असतील तर शंभर टक्के कोणाचा तरी पाठिंबा आहे.’ असं म्हणत काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी नाव न घेता भाजप आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्ष पदी निवड झाल्याने सोलापूरच्या श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने […]

Mumbaitak
follow google news

सोलापूर: ‘अधिकारी जेव्हा राज्याच्या गृहमंत्र्यांवर आरोप करतात तेव्हा तो कोणाच्या पाठिंब्याशिवाय होऊ शकत नाही. असे जर आरोप होत असतील तर शंभर टक्के कोणाचा तरी पाठिंबा आहे.’ असं म्हणत काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी नाव न घेता भाजप आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

हे वाचलं का?

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्ष पदी निवड झाल्याने सोलापूरच्या श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.

अँटेलिया प्रकरणाचे हादरे गृहमंत्र्यांपर्यंत, कसे अडकत गेले अनिल देशमुख?; पाहा सविस्तर रिपोर्ट

आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात गंभीर आरोप केले होते. त्यांच्या लेटरबॉम्बमुळे राज्यात एकच खळबळ उडाली होती. मात्र, हे आरोप खोटे असल्याचं गृहमंत्री देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटलं होतं. मात्र, तरीही विरोधकांनी याप्रकरणी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. याच सगळ्यावर प्रतिक्रिया देताना प्रणिती शिंदेंनी असं म्हटलं की, कुणाच्या पाठिंब्याशिवाय गृहमंत्र्यांवर अधिकारी आरोप करु शकत नाही.

‘मुंबईत सतराशे बार आहेत, रेस्टॉरंट आहेत; ४०-५० कोटी सहज जमू शकतात!’

यावेळी राष्ट्रपती राजवटीबाबत देखील प्रणिती शिंदेंनी भाष्य केलं. त्या असं म्हणाल्या की, ‘राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी ही ‘बेसलेस’ आहे. राज्यात मुख्यमंत्री आहेत. सगळं प्रशासन व्यवस्थित काम करतंय. असं असताना एका अधिकाऱ्याच्या आरोपामुळे राष्ट्रपती राजवटची मागणी करणे योग्य नाही.’

शरद पवारांबद्दल आम्हाला प्रचंड आदर आहे, पण…

दरम्यान, याचवेळी प्रणिती शिंदे यांनी यूपीएच्या अध्यक्षपदाबाबत देखील भाष्य केलं. ‘यूपीएच्या अध्यक्षपदाबाबत संजय राऊत यांनी केलेलं वक्तव्य हे त्यांचं वैयक्तिक मत आहे. शरद पवार यांच्याबद्दल आम्हाला प्रचंड आदर आहे. महाविकास आघाडी सरकार बनविण्यात पवार साहेबांचे योगदान मोठे आहे. मात्र सोनिया गांधी या यूपीएच्या चेअरमन आहेत आणि त्याच आमच्या नेत्या आहेत.’ अशी प्रतिक्रिया आमदार प्रणिती शिंदे यांनी दिली.

ठाकरे सरकारवर लेटरबॉम्ब ! अनिल देशमुखांनी वाझेंना दर महिन्याला १०० कोटी मागितले – परमबीर सिंग

पाहा रश्मी शुक्लांबाबत काय म्हणाल्या प्रणिती शिंदे

दरम्यान राज्याच्या गुप्तचर विभागाच्या माजी आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यावर सुरु असलेल्या टीकेबाबत देखील प्रणिती यांनी भाष्य केलं. ‘रश्मी शुक्ला यांच्यावर होणारे आरोप जर खोटे असतील तर आम्ही त्यांच्या सोबत आहोत. मात्र या प्रकरणाची कारवाई अद्याप सुरु आहे. कारवाई पूर्ण झाल्यानंतर यावर भाष्य करु.’ असंही आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या.

‘राज्यात लॉकडाऊन होऊ नये’

‘राज्यात लॉकडाऊन होणार नाही. लॉकडाऊन होऊ देखील नये. लॉकडाऊनची झळ गरीबांना जास्त बसते. मास्कचा वापर केला तर परिस्थिती टाळता येऊ शकते. लॉकडाऊन होऊ नये या मताची मी आहे.’ असं मत देखील यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी दिली.

    follow whatsapp