तेलंगणातील एका व्यक्तीने चक्क लाकडापासून ट्रेडमिल बनवल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या ट्रेडमिलची खासियत म्हणजे ही ट्रेडमिलसाठी विजेची गरजच नाही. ही ट्रेडमिल बनवणाऱ्या व्यक्तीचंही कौतुक होत असून, अशा नव्या गोष्टींची दखल घेणाऱ्या उद्योगपती आनंद महिद्रांनाही हा व्हिडीओ पोस्ट करायचा मोह आवरला नाही. इतकंच नाही, तर त्यांनी मलाही अशीच एक ट्रेडमिल हवी असंही म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
लाकडापासून बनवलेली ही ट्रेडमिल तेलंगणातील व्यक्तीने बनवली असल्याची माहिती आहे. मात्र, त्या व्यक्तीबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र, ४५ सेकंदाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, अनेकांनी याबद्दल या व्यक्तीचं कौतुक केलं आहे.
लाकडी ट्रेडमिल तयार करतानाचा व्हिडीओ आनंद महिंद्रांनी ट्विट केला आहे. हा व्हिडीओ ट्विट करताना आनंद महिंद्रांनी म्हटलं आहे की, “एक कमोडिटी बनलेलं जग, मशिन्स उर्जेच्या भूकेल्या आहेत. अशा काळात अशा पद्धतीच्या कौशल्यासाठीचं वेड, तास न् तास त्यात स्वतःला झोकून देऊन बनवलेली ही ट्रेडमिल ही फक्त ट्रेडमिल नाही. तर याला कला बनवते. मलाही असं एक हवं आहे.”
लाकडापासून बनवण्यात आलेल्या ट्रेडमिलसाठी विजेची गरज नाही. त्यावरून चालताना ती आपोआप फिरते. त्यामुळे विजेच्या खर्चाची बचत होऊन आरोग्याच्या दृष्टीनंही हे फायद्याचं असल्याचं बोललं जात आहे.
ADVERTISEMENT