एपीजे अब्दुल कलाम पुण्यतिथी: ‘त्या’ दिवशी नेमकं काय घडलं होतं?

मुंबई तक

• 11:55 AM • 27 Jul 2021

नवी दिल्ली: माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम (Apj Abdul Kalam) ज्यांना मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जातं. यांच 27 जुलै 2015 रोजी आयआयएम शिलॉंग येथे व्याख्यान देताना निधन झालं होतं. राष्ट्रपती म्हणून सर्वाधिक प्रसिद्ध असलेले एपीजे अब्दुल कलाम हे 2002 ते 2007 दरम्यान भारताचे 11वे राष्ट्रपती म्हणून काम पाहिलं होतं. 27 जुलै 2015 रोजी […]

Mumbaitak
follow google news

नवी दिल्ली: माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम (Apj Abdul Kalam) ज्यांना मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जातं. यांच 27 जुलै 2015 रोजी आयआयएम शिलॉंग येथे व्याख्यान देताना निधन झालं होतं. राष्ट्रपती म्हणून सर्वाधिक प्रसिद्ध असलेले एपीजे अब्दुल कलाम हे 2002 ते 2007 दरम्यान भारताचे 11वे राष्ट्रपती म्हणून काम पाहिलं होतं.

हे वाचलं का?

27 जुलै 2015 रोजी आयआयएम शिलॉंगच्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना कलाम मंचावर पडले. त्यांना तात्काळ शहरातील एका रुग्णालयात नेण्यात आलं होतं. जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं होतं. हृदयविकाराच्या तीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला होता असं म्हटलं जात आहे. जाणून घेऊया त्या दिवशी नेमकं झालं होतं तरी काय.

आयआयएम शिलॉंगचे तत्कालीन संचालक सांगतायेत ‘त्या’ दिवसाबाबत

आयआयएम शिलॉंगचे तत्कालीन संचालक अमिताभ डे यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, संस्थान डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना माजी राष्ट्रपतींपेक्षा शिक्षक म्हणून अधिक पाहत होतं. सर्वसाधारणपणे आयआयएम व्यवस्थापन आणि सामाजिक विषयांवर चर्चासत्रे आयोजित करतात. डॉ. कलाम हे मूळत: शास्त्रज्ञ असल्याने आम्ही राष्ट्रीय विकासासाठी विज्ञान आणि मानवतावाद या विषयावर चर्चासत्र आयोजित केले होते.

एपीजे अब्दुल कलाम हे 27 जुलै 2015 रोजी आयआयएम-शिलॉंगच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना ‘मानव राहण्यायोग्य ग्रह’ या विषयावर व्याख्यान देणार होते. भाषण सुरू झाल्यावर सुरुवातीला डॉ. कलाम हे आपले अनुभव सांगत होते. भाषण सुरू झाल्यानंतर साधारण 6.30 वाजता म्हणजे भाषण सुरु झाल्यानंतर 15 मिनिटांनी ते अचानक बेशुद्ध झाले.

त्यावेळी तिथे उपस्थित सर्व विद्यार्थी, अधिकारी व कर्मचारी हे खूपच घाबरले. त्यांनी डॉ. कलाम यांना कर्मचार्‍यांच्या मदतीने जवळच असलेल्या बेथानी रुग्णालयात नेले. तिथे सैन्य रुग्णालय आणि ईशान्य गांधी प्रादेशिक आरोग्य व वैद्यकीय विज्ञान विभागातील डॉक्टरांच्या पथकाने त्यांच्यावर उपचार करण्याचा देखील प्रयत्न केला. परंतु, डॉक्टर त्यांच्यावर यशस्वी उपाय करण्याआधीच त्यांनी या जगाचा निरोप घेतला होता.

चंद्रकांत पाटील म्हणतात, अब्दुल कलामांना मोदींनी राष्ट्रपती केलं!

त्यामुळे संध्याकाळी 7 वाजून 45 मिनिटांनी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना मृत घोषित करण्यात आलं होतं. दरम्यान, या वृत्तानंतर अवघ्या देशावर शोककळा पसरली होती. अब्दुल कलाम यांच्या रुपाने भारताने अत्यंत तल्लख बुद्धीच्या शास्त्रज्ञाला गमावलं होतं.

    follow whatsapp