Bollywood: नवीन वर्षाची सुरूवात ही सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत (Celebritiy) सर्वांनीच उत्साहात केली. प्रत्येकाचे यादिवशीचे प्लान काही वेगवेगळे होते. काहींनी आपले कुटुंब आणि मित्र-मैत्रिणींसह हे नवीन वर्ष (New Year 2023) साजरं केलं तर, काहींनी बाहेर फिरायला जाण्याचा प्लान केला. अभिनेत्री मलायका अरोरासाठीही (Malaika Arora) नवीन वर्षाचं सेलिब्रेशन खूप खास होते. हे तिने शेअर केलेल्या फोटोमधूनच दिसते. मलायकाचे आणि अर्जून कपूरचं (Arjun Kapoor) नातं हे कुणापासून लपलेलं नाही. नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी मलायका आणि अर्जून एकत्र होते. मात्र, फोटोत दोघंही वेगळे उभे दिसले. हा फोटो व्हायरल होताच सोशल मीडियावर एकच चर्चा रंगू लागली ती म्हणजे मलायका आणि अजूनच्या ब्रेकअपची. (Arjun-Malaika break up contraversy on social media)
ADVERTISEMENT
Nashik Fire : नववर्षाला गालबोट; नाशिकच्या जिंदाल ग्रुप कंपनीत आगीची मोठी दुर्घटना
अभिनेता वरुण धवन त्याची पत्नी नताशा दलाल, अर्जुन कपूर, मलायका अरोरा यांनी त्यांच्या इतर काही मित्रांसोबत नवीन वर्षाची पार्टी साजरी केली. यावर्षी हे सर्व एकत्र होते. याचा फोटोही व्हायरल होत आहे. चाहत्यांच्या लक्षात आले की अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा फोटोत वेगळे उभे आहेत. एका चाहत्याने कमेंट सेक्शनमध्ये लिहिले – दोघे वेगळे का आहेत? आणखी एका चाहत्याने कमेंट केली – दोघांचे ब्रेकअप झाले का? अशा कमेंट्समुळे ते वेगळे झाल्याची चर्चा सगळीकडे होऊ लागली.
इन्स्टाग्रामवर अर्जूनसोबतचा दुसरा फोटो शेअर करत चाहत्यांचा गैरसमज केला दूर!
ग्रुप फोटोमध्ये वेगळे उभे का आहेत अशा प्रकारचे प्रश्न विचारल्यानंतर, अभिनेत्रीने तिचा आणखी एक फोटो शेअर केला ज्यामध्ये हे दोघे एकत्र दिसले. मलायकाने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले, “हॅलो 2023… लव्ह अँड नाईट”
असे कित्येक वेळा घडले आहे ज्यावेळी मलायका आणि अर्जूनच्या नात्यावर बोट ठेवण्यात आले. याआधीही त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या. अर्जुन कपूर मलायकापेक्षा १२ वर्षांनी लहान आहे, यामुळे मलायका आणि त्यांना अनेकदा सोशल मीडियावर युजर्सद्वारे ट्रोल केले जाते. मात्र, काही काळापूर्वी अर्जून आणि मलायकाने त्यांच्या वयावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले होते. त्यांना कोणाचीही पर्वा नाही, त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे असे त्यांनी म्हटले होते.
ADVERTISEMENT