दादरी (हरियाणा): हरियाणाच्या चरखी दादरीमध्ये एका महिलेने पती-पत्नीच्या नात्याला कलंक फासला आहे. पत्नीने मित्रासोबत मिळून भारतीय लष्करात जवान असलेल्या आपल्या पतीची हत्या केल्याची खळबळजनक घटना आता समोर आली आहे. मृत व्यक्ती हा भारतीय लष्करात जवान होता. तो सुट्टीवर घरी परतलेला असताना त्याची हत्या करण्यात आली.
ADVERTISEMENT
हे प्रकरण किशनपुरा येथील आहे. जिथे सुट्टीवर घरी आलेल्या प्रवीण कुमारचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. प्रवीण हा 22 सिग्नल रेजिमेंट मेरठमध्ये कॉन्स्टेबल म्हणून सैन्यात तैनात होता.
दरम्यान, एका जवानाची हत्या झाल्याचं समोर आल्याने संपूर्ण हरियाणात एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास केला. त्यावेळी या हत्येमागचं सत्य समोर आल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला. या जवानाची हत्या दुसरं-तिसरं कोणी नाही तर खुद्द त्याच्या पत्नीनेच केली असल्याचं समोर आलं आहे. आपल्या एका मित्राच्या मदतीने तिने ही हत्या घडवून आणल्याचं आता समोर आलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण हा पुन्हा लवकरच सीमेवर जाणार होता. पण त्याच्या एक दिवस आधीच त्याच्या पत्नीने त्याला झोपेच्या गोळ्या खाऊ घातल्या आणि त्यानंतर त्याचा गळा दाबून खून केला.
5 फेब्रुवारी रोजी प्रवीणचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला. त्यावेळी त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका येऊन झाला असावा असं सांगितले. रात्रीचे जेवण करून तो झोपला होता आणि सकाळी उठल्यावर त्याला चक्कर येत असल्याचे कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले होते. त्यानंतर त्याला दादरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
5 फेब्रुवारी रोजी हवालदार प्रवीण यांना पूर्ण राजकीय सन्मानासह अंतिम निरोप देण्यात आला. मात्र हवालदार प्रवीण यांच्या मृत्यूनंतर आठवडाभरानंतर चौकशी मंडळाने सादर केलेल्या शवविच्छेदन अहवालामुळे एकच खळबळ उडाली.
अरेरे! अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या मुलाला आईने परकरच्या नाडीने गळा आवळून संपवलं
शवविच्छेदन अहवालात प्रवीणचा मृत्यू गळा दाबून आणि गुदमरल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तात्काळ तपासाला सुरुवात केली.
चौकशीत प्रवीणची पत्नी मोनिका हिने आपला मित्र विकीसोबत खुनाचा कट रचल्याचे सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोनिकाने पतीला झोपेच्या गोळ्या दिल्या आणि रात्री उशिरा दोघांनी मिळून प्रवीणचा गळा आवळून खून केला. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. मात्र, ही हत्या नेमक्या कोणत्या कारणामुळे करण्यात आली हे मात्र अद्याप समजू शकलेलं नाही.
ADVERTISEMENT