कॉर्डेलिया क्रूझ जहाजावर टाकलेल्या धाडीत एनसीबीने अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याच्यासह आठ जणांना अटक केली होती. आर्यन खानला अटक करण्यात आल्यामुळे या प्रकरणाची सर्वत्र चर्चा होत आहे. या प्रकरणावर राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी आपली भूमिका मांडली.
ADVERTISEMENT
दौंड तालुक्यातल्या खुटबाव येथील पोपट किसनराव थोरात महाविद्यालयाचे नामांतरण सुप्रिया सुळे यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना खासदार सुळे यांनी आर्यन खान प्रकरणावर भाष्य केलं. त्याचबरोबर उत्तर प्रदेशातल्या हिंसाचाराच्या घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत या घटनेची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली.
SRK’s Son: ‘आर्यनच्या फोनमध्ये सापडलेत धक्कादायक फोटो, 11 ऑक्टोबरपर्यंत कस्टडी द्या’, NCB ची मागणी
अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानवर एनसीबीने केलेल्या कारवाईबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘एनसीबीने केलेल्या कारवाईतून सत्य बाहेर येईलच. मी स्वतः तंबाखू आणि गुटख्याबाबत आंदोलन करत असते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रात गुटखा बंदी केली. त्यानंतर संपूर्ण देशात त्याची अंमलबजावणी झाली. यासंदर्भात शाळा-महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन होण्याची गरज आहे’, असं मत त्यांनी मांडलं.
लखीमपूर खीरी : ‘त्या’ आठ जणांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला; पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काय?
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरीमध्ये घडलेल्या घटनेचा खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र शब्दात निषेध केला. ‘या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी’, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
किरीट सोमय्या बुधवारी शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात, आता काय आरोप करणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष
भाजपचे नेते किरीट सोमय्या उद्या बारामती दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या बारामती भेटीबद्दल माध्यमांनी विचारलं असता, मिश्किल हास्य करत सुळे यांनी ‘बारामती हे देशातले चांगलं शहर आहे. त्यामुळे इथे प्रत्येकाला यायला आवडते. त्यामुळे सोमय्या यांचं बारामतीला येणं काही नवीन नाही’, असं उत्तर दिलं.
ADVERTISEMENT