शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याचा आज वाढदिवस आहे. तुरुंगातून परतल्यापासून आर्यन खान लो प्रोफाईल लाईफस्टाईल प्रेफर करतो आहे. या वर्षी वाढदिवस असल्याने आर्यन आणि त्याच्या कुटुंबाने काहीही प्लान केलेलं नाही. अशात अभिनेत्री जुही चावलाने त्याला खास शुभेच्छा दिल्या आहेत.
ADVERTISEMENT
काय म्हटलं आहे जुही चावलाने?
आर्यन खानला जुहीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेतच. तसंच आर्यनसोबत जुहीने आपल्या मुलांचा लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो डिस्नेलँडचा असावा असं दिसतं आहे. त्यासोबत एक कॅप्शनलही लिहिलं आहे. या फोटोत सगळी लहान मुलं दिसत आहेत. आर्यन खानच्या नावाने 500 झाडं लावणार आहे असंही जुही चावलाने म्हटलं आहे. देव तुझं सगळ्या संकटांपासून रक्षण करो आणि तुझ्यावर दुःखाची सावलीही पडायला नको अशी प्रार्थनाही जुहीने केली आहे.
आर्यन खानला 2 ऑक्टोबरला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. NCB ने छापा मारून ही कारवाई केली होती. त्यानंतर त्याची रवानगी ऑर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. आर्यन खानला 27 ऑक्टोबरला जामीन मंजूर करण्यात आला. 28 ऑक्टोबरला अभिनेत्री जुही चावलानेच आर्यन खानचा जामीन भरला होता. आज आर्यन खानचा वाढदिवस आहे. या निमित्ताने जुहीने आर्यनला खास शब्दांमध्ये शुभेच्छा दिल्या आहेत. ज्याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगते आहे.
28 ऑक्टोबरला काय झालं?
अभिनेत्री जुही चावलाने आर्यन खानचा जामीन भरला . जामीन भरण्यासाठी कुटुंबीयांपैकी कुणी चालत नाही. फॅमिली फ्रेंड्सने जामीन भरायचा असतो त्यामुळेच जुही चावलाने हा जामीन भरला होता. जुही चावला सेशन्स कोर्टात पोहचली आणि तिने सगळ्या औपचारिकता पूर्ण केल्या. जुही चावला आणि शाहरुख खान हे दोघेही रेड चिलीज एंटरटेन्मेंट या कंपनीत पार्टनर आहेत. तसंच शाहरुख खान आणि जुही चावला यांची मैत्रीही सगळ्यांनाच माहित आहे. त्यामुळेच जुही चावला आर्यन खानसाठी जामीनदार राहिली. शाहरुख खानच्या जवळच्या लोकांमध्ये जुही चावलाचा समावेश होतो.
शाहरुख खानचा मुलगा आर्यनला जामीन मिळाल्यानंतर ‘मन्नत’ बाहेर अक्षरश: दिवाळीसारखे वातावरण होतं. सुपरस्टार शाहरुखच्या चाहत्यांना आर्यनच्या जामिनाची बातमी समजताच त्यांनी तात्काळ मोठ्या संख्येने मन्नतच्या बाहेर गर्दी केली आहे. यानंतर त्यांनी पोस्टर, फटाके आदींद्वारे आपला आनंद व्यक्त करणं सुरु ठेवलं होतं.
ADVERTISEMENT