Serum इन्स्टि्टयुटने राज्यांसाठी कोव्हिशिल्ड लसीची किंमत कमी केली आहे. सिरमचे सीईओ अदर पूनावाला यांनी ट्विट करून याबद्दलची माहिती दिली आहे. राज्यांसाठी आता या लसीची किंमत 400 ऐवजी 300 रूपये असणार आहे. तातडीच्या संमतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे राज्यांचे लसींसाठी खर्च होणारे कोट्यवधी रूपये वाचू शकणार आहेत असंही अदर पूनावाला यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
अदर पूनावालांची आणखी एका लसीबाबत घोषणा, जूनपर्यंत येणार नवी लस?
अदर पूनावाला यांनी आणखी काय म्हटलं आहे?
कोव्हिशिल्डच्या किंमती आम्ही राज्यांसाठी कमी करतो आहोत. राज्य सरकारांसाठी कोव्हिशिल्डच्या एका लसीच्या डोसची किंमत 400 वरून 300 रूपये करत आहोत. लसीच्या कमी केलेल्या किमती तातडीने लागू करण्यात आल्या आहेत. कोव्हिशिल्डच्या लसीची किंमत कमी केल्याने देशातील नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी मदत होणार आहे असंही पूनावाला यांनी म्हटलं आहे.
सिरमच्या लसीचे जुने दर?
सिरम इन्स्टिट्युटने काही दिवसांपूर्वी भारत सरकारच्या सूचनेनुसार कोव्हिशिल्ड लसीची किंमत निश्चित केली होती.तेव्हा राज्य सरकारांना 400 रूपयांमध्ये तर खासगी रूग्णालयांमध्ये 600 रूपये प्रति डोस अशी घोषणा केली होती.
भारतात सध्या दोन लसी आहेत
भारतात कोरोना प्रतिबंध करणाऱ्या दोन लसी आहेत एक आहेत. एक आहे सिरमची कोव्हिशिल्ड ही लस आणि दुसरी लस आहे भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन. केंद्र सरकारने 18 वर्षांपेक्षा पुढील वयाच्या सगळ्यांना लस देण्याचं निश्चित केलं आहे. लसीकरणाचा तिसरा टप्पा 1 मेपासून सुरू होणार आहे.
ADVERTISEMENT