चंद्रपूर: चंद्रपुरात कोरोनातून बरे झालेले तब्बल 10 रुग्णांना म्युकोरमायकोसिस (Mucormycosis) या ब्लॅक फंगस रोगाची लागण झाल्याची खळबळजनक माहिती आता समोर आली आहे. एकट्या चंद्रपुरात एकाच वेळी ब्लॅक फंगसचे 10 रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.
ADVERTISEMENT
चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत म्युकोरमायकोसिस आजाराचे 10 रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे. अत्यंत घातक असलेल्या या आजाराकडे दुर्लक्ष केल्यास हा जीवघेणा ठरू शकतो. सध्या जिल्ह्यातील काही खाजगी डॉक्टरांनी या आजाराच्या रुग्णांची पुष्टी केली आहे. यामुळे आरोग्य विभागाने कोरोना झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालयात पोस्ट कोविड ओपीडी सुरू केली आहे. यातील काही रुग्णांना तातडीने नागपुरात रवाना करण्यात आले आहे.
या आजाराची लक्षणे म्हणजे आधी नाकाद्वारे काळा दुर्गंधी स्राव येणं आणि नंतर डोळ्यांवर सूज, जबडा दुखणे, दात दुखणे अशी आहेत. याचे लवकर निदान आणि उपचार न झाल्यास ब्लॅक फंगल हे थेट मेंदूपर्यंत पोहचतात आणि ज्यामुळे रुग्णाच्या जीवाला देखील धोका पोहचतो. त्यामुळे बऱ्या झालेल्या कोव्हिड रुग्णांना जर अशा स्वरुपाची लक्षणे दिसत असतील तर त्यांनी तात्काळ संबंधित डॉक्टरांकडून त्यावर त्वरीत उपचार करुन घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोरोनावरील औषधांमुळे होणारा म्युकोरमायकोसिस आजार का ठरतोय घातक?
म्युकोरामायसिस म्हणजेच ब्लॅक फंगलची लागण नेमकी कशामुळे होत आहेत?
डॉ. लहाने यांचं म्हणणं आहे की, फंगल इंफेक्शन हे जुनंच आहे. पण कोरोनामुळे याचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. कोरोना रुग्णांवर उपचारासाठी जे स्टेरॉईड वापरले जात आहेत त्यामुळे रुग्णांची शुगर लेव्हल (रक्तातील साखर) वाढते. या व्यतिरिक्त काही औषधे रुग्णाची प्रतिकारशक्ती कमी करतात. अशावेळी रुग्णांना सहजपणे फंगल इंफेक्शन होतं. ब्लॅक फंगस हे थेट संक्रमित व्यक्तीच्या मेंदूपर्यंत पोहोचतं. अशा परिस्थितीत रुग्णाचा मृत्यू होतो. काही केसेसमध्ये रुग्णाला वाचवण्यासाठी त्याचे डोळे कायमचे काढून टाकावे लागतात.
ENT तज्ज्ञ डॉक्टर संकेत शहा म्हणाले की, कोरोना बरा झाल्यानंतर फंगल इन्फेक्शन हे सर्वात आधी सायनस (नाकात वरच्या बाजूला) होतो. त्याच्या 2 ते 4 दिवसांनंतर ते डोळ्यापर्यंत पोहचतं. त्यानंतर 24 तासात ते मेंदूपर्यंत पोहचतं. अशा परिस्थितीत तात्काळ डोळे काढावे लागतात. जेणेकरून संसर्ग आणखी पुढे जात नाही.
चीनचं जैविक शस्त्र आहे कोरोना? हाती आलेल्या गुप्त माहितीनुसार अमेरिकेने केला दावा..
दरम्यान, गेल्या वर्षी कोरोनाची जी पहिली लाट आली होती तेव्हा देखील गुजरातमध्ये म्युकोरमायकोसिस किंवा ब्लॅक फंगसचं संसर्ग आढळून आला होता. त्यावेळी याचे सर्वाधिक रुग्ण हे अहमदाबादमध्ये आढळून आले होते. त्यानंतर बडोद्यात देखील अशाच प्रकारचे रुग्ण आढळून आले होते. अहमदाबादमध्ये 44 आणि बडोद्यात 7 रुग्ण सापडले होते.
ADVERTISEMENT