सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर धक्कादायक घटना घडली आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्याजवळ वर्कुटे बुद्रुक येथून जाताना स्क्रोर्पिओ गाडीवर गोळीबार करून तब्बल 3 कोटी 60 लाख रुपये लुटल्याची घटना शुक्रवारी घडली आहे. महामार्गावर गोळीबार करून लुटायची ही घटना घडल्याने या रस्त्यावर वाहतूक करणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे आरोपींनी महामार्ग पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं केलं आहे.
ADVERTISEMENT
पुणे सोलापूर मार्गावर रात्रीच्या अडीच वाजता दरोडेखोरांनी केला हल्ला
गुजरात येथील व्यावसायिक भावेशकुमार अमृत पटेल, (वय 40 वर्ष) यांनी इंदापूर पोलिसात याबाबत तक्रार दाखल केली आहे. पटेल हे शुक्रवारी मध्यरात्री 2:30 वाजता सोलापूर-पुणे महामार्गावरून आपल्या स्कॉर्पिओ गाडीने जात होते. वर्कटी गावाजवळ गतिरोधकामुळे गाडीची गती कमी झाल्याचा फायदा उचलत चारी बाजूने चार जणांनी लोखंडी रॉडने गाडीवर मारायला सुरुवात केली. तेंव्हा स्कॉर्पिओच्या ड्राइव्हरने गाडी न थांबवता तशीच पुढे नेली. त्यादरम्यान दोन कारमधून चार जणांनी त्यांचा पाठलाग केला.
गाडी थांबवत नसल्यानं केली फायरिंग
गाडी थांबवत नसल्याने दरोडेखोरांनी आपल्याकडील असलेल्या पिस्टलने गाडीवर फायरिंग करायला सुरु केली. फायरींग करून दरोडेखोरांनी गाडी थांबवायला भाग पाडलं. दोन कारमधून चार जण बाहेर पडले आणि दोघे आत बसून राहिले. चौघांनी पटेल यांना मारहाण करत त्यांच्याकडील 3 कोटी 60 लाखांची रोकड आणि मोबाईल घेऊन पसार झाले. लुटण्यात आली रोकड ही हवालामधील असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र पोलिसांनी याबाबत गोपीनियता ठेवली आहे. पटेल इतकी मोठी रक्कम गाडीतून नेत असल्याची चोरांना पहिल्यापासून माहिती होती. त्यांच्यावर रेखी ठेऊन दरोडा टाकल्याचं संशय व्यक्त केला जात आहे.
दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी 4 पथक रवाना
कसंबसं घाबरलेले पटेल यांनी इंदापूर पोलीस स्टेशन गाठले आणि झालेली हकीगत पोलिसांना सांगितली. घटनेचं गांभीर्य ओळखून पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक गणेश इंगोले, बारामती डीव्हाएसपी अभिनव देशमुख आणि इंदापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा तपास करण्यासाठी पोलिसांचे चार पथक गठीत करण्यात आल्याचं पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी सांगितलं. लवकरच आमच्या पथकांना यश येईल, असं पोलिसांनी सांगितलं.
ADVERTISEMENT