नाशिक: नाशिकमधील मखमलाबाद येथे दोन बहिणींना जिवंत जाळण्याची अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. शिंदेनगर परिसरात ही घटना घडली असून यामध्ये दोघी बहिणी गंभीररित्या जखमी झालं असल्याचं समजतं आहे. मंगळवारी (11 ऑगस्ट) ही घटना घडली आहे. या घटनेत घरातील फर्निचरसह अनेव वस्तू जळून खाक झाल्या आहेत.
ADVERTISEMENT
ही आग याच भागातील एका रिक्षाचालकाने लावली असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. मात्र, आरोपीने असे भयंकर कृत्य कोणत्या कारणामुळे हे अद्याप समजू शकलेलं नाही. याप्रकरणी पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली असून आता पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
नेमकी घटना काय घडली?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रदीप गौड हे आपल्या आपल्या संपूर्ण कुटुंबासह शिंदेनगरमधील भाविक बिलाजियो या सोसायटीत राहतात. गौड यांच्या आई-वडिल, भाऊ, मुले पुतणे असे एकूण दहा जण राहतात. मंगळवारी प्रदीप यांची मावशी भारती गौड (वय 55) या बारा वाजेच्या सुमारास प्रदीप यांच्या घरी आल्या होत्या. त्याच वेळी एक रिक्षावाला त्यांच्या पाठोपाठ घरी आला आणि त्याने थेट भारती गौड यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
एवढंच नव्हे तर त्याने आपल्यासोबत पेट्रोल देखील आणलं होतं. त्याने ते पेट्रोल घरातील हॉलमध्ये टाकलं आणि आग घराला आग लावली. यानंतर त्याने तिथून तात्काळ पळ काढला. ज्यावेळी हा संपूर्ण प्रकार घडला तेव्हा भारती गौड यांच्यासह त्यांची बहीण सुशील गौड (वय 65, प्रदीप यांची आई), आजोबा जानकीदास, मुलं पार्थ, चिराग हे घरातच होते.
दरम्यान, जेव्हा हा प्रकार सुरु होता तेव्हा पार्थ हा बेडरुममध्येच होता. सगळ्या गोंधळानंतर तो बाहेर आला तेव्हा त्याने हॉलला आग लागल्याचं पाहिलं. त्यावेळी त्याने बेडरुममध्ये जाऊन आपल्या आई-वडिलांना फोनवरुन या घटनेची माहिती दिली.
दुसरीकडे आग लागल्यानंतर गौड यांच्या शेजाऱ्यांनी तात्काळ पाणी आणून काही प्रमाणात आग विझवली. तसंच त्यांनी अग्निशमन दल आणि पोलिसांना देखील याबाबतची माहिती दिली. मात्र, तोपर्यंत या आगीत सुशीला गौड आणि भारती गौड या दोन्ही बहिणी प्रचंड भाजल्या होत्या. यामध्ये त्यांच्या घराचं देखील प्रचंड नुकसान झालं आहे.
Crime: घरावर पेट्रोल टाकून कुटुंबातील सदस्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न
दरम्यान, दोन्ही बहिणींना जवळच्याच शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. गौड यांच्या शेजाऱ्यांना पोलिसांनी अशी माहिती दिली आहे की, आरोपीला त्यांनी पळून जाताना पाहिलं असून तो देखील या घटनेत भाजला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आता आरोपीला शोधण्याचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर आहे.
ADVERTISEMENT