Bacchu Kadu :” मी ५ तारखेला घरात आहे, तू..” रवी राणांना इशारा

मुंबई तक

02 Nov 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:41 AM)

अपक्ष आमदा रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातला वाद पुन्हा पेटणार हेच दिसतं आहे. कारण रवी राणा यांनी बच्चू कडूंना इशारा दिला आहे. तो इशारा स्वीकारत बच्चू कडू यांनी प्रतिइशारा दिला आहे. आमदार रवी राणा यांनी काय नेमकं काय म्हटलं आहे? रवी राणाने उद्धव ठाकरे यांचा दम खाल्ला नाही, बच्चू कडू तर कुणीच नाही. रवी […]

Mumbaitak
follow google news

अपक्ष आमदा रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातला वाद पुन्हा पेटणार हेच दिसतं आहे. कारण रवी राणा यांनी बच्चू कडूंना इशारा दिला आहे. तो इशारा स्वीकारत बच्चू कडू यांनी प्रतिइशारा दिला आहे.

हे वाचलं का?

आमदार रवी राणा यांनी काय नेमकं काय म्हटलं आहे?

रवी राणाने उद्धव ठाकरे यांचा दम खाल्ला नाही, बच्चू कडू तर कुणीच नाही. रवी राणा हा एकदा नाही तर दहावेळा प्रेमाची भाषा करेल. पण जर कुणी दम देत असेल तर त्याला घरात घुसून मारण्याची धमकी आहे. पहिल्यांदा चूक केली म्हणून माफ करतोय असं बच्चू कडू यांनी म्हणत आमदार रवी राणांवर टीका केली होती. आज रवी राणा यांनी या टीकेला उत्तर दिलं आहे.

बच्चू कडूंनी काय म्हटलं आहे?

मी भाषणात कोथळा काढेन असा उल्लेख केला होता. यात कुठेही रवी राणाचा उल्लेख केला नव्हता. कुणी आमच्यावर विनाकारण आरोप केला तर त्याचा कोथळा बाहेर काढू असं मी बोललो होतो. आता रवी राणांनी ते स्वतःवर ओढवून घेतलं असेल तर तो त्यांचा विषय आहे. राहिला विषय की घरी येऊन मारण्याचा तर मी तयार आहे. त्याने घरी याव किंवा अन्यथा कुठे मला बोलवावं मी तिथे येतो असं प्रत्युत्तर बच्चू कडूंनी दिलं आहे.

रवी राणाने पुन्हा वाद सुरू केला आहे

रवी राणाने पुन्हा वाद सुरू केला आहे. त्याची ती सवय आहे.. तो एवढा मोठा नाही. आमदार होऊन दाखव असं मला तो सांगतोय. हे ठरवणारा तो कोण? मी आमदार होणार की नाही हे जनता ठरवेल. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस- यांच्या बोलणार आहे. रवी राणाला सांगतो मी ५ तारखेला आहे, त्याने मला मारायला यावं मी शांतता बाळगणार. त्याला मला मारायचं असेल तर त्याने सांगावं मी तयार आहे, मार खायलाही तयार आहे असा प्रति इशारा बच्चू कडूंनी दिला आहे.

    follow whatsapp