अभिनेत्री कंगना राणावत हिच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याचं दिसून येतंय. प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्या अब्रु नुकसानीचं प्रकरण अभिनेत्री कंगनाला भोवलंय. या प्रकरणादरम्यान कंगनाला आज दंडाधिकारी न्यायालयाने जामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. जावेद अख्तर यांनी अभिनेत्री कंगना राणौतवर अब्रु नुकसानीचा दावा केला होता.
ADVERTISEMENT
अंधेरीतील दंडाधिकारी न्यायालयात आज या प्रकरणावर सुनावणी करण्यात आली. यावेळी जावेद अख्तर यांच्याकडून त्यांच्या वकील वृंदा ग्रोवर यांनी पक्ष मांडला. सुनावणी दरम्यान कंगना राणौत आणि तिचे वकील उपस्थित नव्हते. दरम्यान 1 फेब्रुवारी रोजी केलेल्या सुनावणीत कंगनाला पुढील सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते.
यापूर्वी या प्रकरणात झालेल्या सुनावणीमध्ये अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाने कंगनाला नोटीस बजावली होती. गेल्यावर्षी जूनमध्ये अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृतयूनंतर एका मुलाखतीत जावेद अख्तर यांच्यावर टीका केली होती. त्यावेळी जावेद यांना कंगनाने केलेली टीप्पणी निराधार असून तिच्यावर अब्रु नुकसानीचा दावा ठोकला होता.
ADVERTISEMENT