Balasaheb थोरातांचा राजीनामा, सुधीर तांबेंनी काँग्रेसला सुनावलं; म्हणाले..

मुंबई तक

07 Feb 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:05 AM)

Balasaheb Thorat Resign and Sudhir Tambe reaction: मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या (Vidhan Parishad Election) निमित्ताने राज्यातील काँग्रेसमधील (Congress) वाद चव्हाट्यावर आल्याचं काही दिवसांपूर्वीच पाहायला मिळालं होतं. मात्र, आज (7 फेब्रुवारी) काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. कारण काँग्रेसचे आमदार आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांनी (Balasaheb Thorat) थेट विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे दिला आहे. काँग्रेसचे […]

Mumbaitak
follow google news

Balasaheb Thorat Resign and Sudhir Tambe reaction: मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या (Vidhan Parishad Election) निमित्ताने राज्यातील काँग्रेसमधील (Congress) वाद चव्हाट्यावर आल्याचं काही दिवसांपूर्वीच पाहायला मिळालं होतं. मात्र, आज (7 फेब्रुवारी) काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. कारण काँग्रेसचे आमदार आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांनी (Balasaheb Thorat) थेट विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे दिला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन बाळासाहेब थोरात यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असल्याची जोरदार चर्चा आहे. याच सगळ्याबाबत आता काँग्रेसमधून निलंबित केलेले माजी आमदार सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांनी मात्र, पक्षाला खडे बोल सुनावले आहेत. (balasaheb thorat resignation and sudhir tambe first reaction gave tough words to congress)

हे वाचलं का?

सत्यजित तांबे यांना उमेदवारी देण्यावरून झालेला गोंधळ आणि त्यानंतर झालेले आरोप-प्रत्यारोप.. अशातही सत्यजीत तांबेंनी अपक्ष म्हणून मिळविलेला विजय या सगळ्या गोष्टींमुळे काँग्रेसमधील दुफळी समोर आली आहे. या सगळ्या गोष्टींनी व्यथित होऊनच बाळासाहेब थोरातांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. त्यावर सुधीर तांबेंनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत राज्यातील काँग्रेस नेतृत्वाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

‘बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यावर अशी वेळ का यावी? याचा काँग्रेसने विचार करावा’ असा खडा सवाल सुधीर तांबे यांनी केला आहे.

Balasaheb Thorat: वाद विकोपाला! थोरातांचा विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा

पाहा सुधीर तांबे नेमकं काय म्हणाले:

‘खरं तर ही खूप व्यथित करणारी गोष्ट आहे. कारण बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. ज्याला आपण म्हणतो की, निष्ठा.. जी त्यांची काँग्रेसच्या विचारावर आहे. अशा व्यक्तीला.. मला माहिती नाही.. माझी काही त्यांच्याशी चर्चा झालेली नाही. पण त्यांच्यावर असा निर्णय घेण्याची वेळ का यावी? याचा कुठेतरी गंभीर विचार व्हायला हवा.’

‘कसं असतं की, जेव्हा एखादी व्यक्ती त्या पक्षाच्या विचारधारेशी जोडलेली आहे त्यासाठी इतक्या समर्पित भावनेने काम करतं त्यात कुठे तरी त्यांना विश्वासात न घेणं म्हणा.. किंवा त्यांना योग्य पद्धतीने सन्मान न मिळणं.. ज्या काही घडामोडी घडल्या आहेत त्या काळात मला असं वाटतं की, त्यांच्याशी चर्चा व्हायला हवी होती असं वाटतं. माझी काही साहेबांशी चर्चा झालेली नाही. त्यामध्ये मी अधिक काही बोलू शकत नाही.’

‘फक्त मी एवढंच म्हणतो की,काँग्रेसच्या या अडचणीच्या काळामध्ये ज्यांनी नेतृत्व दिलं. पक्षाच्या पदयात्रा असतील.. सर्व कार्यक्रमात झोकून देऊन काम केलं अशा व्यक्तीवर ही वेळ का यावी? याची पक्षश्रेष्ठींनी गंभीर दखल घ्यावी. असं माझं मत आहे. सत्यजीत तांबे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची जी बाजू आहे ती स्पष्ट केली आहे.’ असं म्हणत सुधीर तांबेंनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींचे कान टोचले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब थोरात, नाना पटोले यांना भेटीदरम्यान दिली ‘ही’ ऑफर

नेमकं प्रकरण काय?

नाना पटोले यांच्याकडे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रं आल्यापासून पक्षातील धुसफूस सातत्यानं चर्चेत आहे. नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीबद्दल अनेकदा काँग्रेस नेत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसमधील नेत्यांचे नाना पटोलेंच्या नेतृत्वाबद्दलचे मतभेद जाहीरपण समोर आलेले.

सत्यजीत तांबे यांनी केलेल्या आरोपानंतर बाळासाहेब थोरातांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठीला पत्र लिहिलं होतं. बाळासाहेब थोरातांनी या पत्रात नाना पटोले यांच्या नेतृत्वाबद्दल जाहीरपणे नाराजी व्यक्त केली असून त्यांनी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेते पदाचा देखील राजीनामा दिला आहे. यामुळे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये भूकंप झाला आहे.

    follow whatsapp