बारामती: बारामती तालुक्यातल्या प्रसिद्ध शिरसाई देवी मंदिराचे दरवाजे तोडून मध्यरात्री देवीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची खळबळजनक घटना नुकतीच समोर आली आहे.
ADVERTISEMENT
मंदिरातील चोरी झालेल्या दागिन्यांमध्ये मुकुट, गळ्यातले दागिने आणि वस्त्रालंकाराचा समावेश आहे. ही संपूर्ण चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच बारामती पोलीस हे घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी पंचनामा करुन चोरीचा तपास सुरू केला आहे.
बारामती तालुक्यातील शिरसुफळ शिरसाई देवी मंदिर पुरातन आणि प्रसिद्ध आहे. या गावातील हे मंदिर प्रसिद्ध असल्याने अनेक भाविक या मंदिराला नेहमीच भेट देत असतात.
राज्यभरात हे मंदिर आणि गाव बरंच प्रसिद्ध आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिराला क वर्ग तीर्थक्षेत्र म्हणून दर्जा मिळाला आहे. असे असताना शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी मंदिराचे दरवाजे तोडून मंदिरात प्रवेश केला आणि देवीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले.
सकाळी पुजाऱ्यांनी चोरीचा प्रकार हा संपूर्ण प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात आणून दिला त्यानंतर संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली.
पुणे: विमानाने पुण्यात यायचे अन् चोरी करायचे, श्रीमंत चोरटे कसे सापडले पोलिसांच्या जाळ्यात?
दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून गुन्हे शोध पथकाचे माध्यमातून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे चोरीचा तपास केला जात आहे. या घटनेचा गावकऱ्यांनी सर्व व्यवहार बंद ठेवून निषेध केला असल्याचे समजते.
मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
काही दिवसांपूर्वीच विविध जिल्ह्यात मोटारसायकल चोरी करणाऱ्या तिघांच्या टोळीला पकडण्यात पंढरपूर पोलिसांना यश आलं आहे. या टोळीतील एका आरोपीवर विविध जिल्ह्यात 80 गुन्हे दाखल असल्याचं कळतं आहे. शहरातून चोरीला गेलेल्या एका दुचाकीचा शोध घेत असताना गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण शाखेने तिघाजणांची टोळी गजाआड केली.
पोलिसांनी आरोपींकडून 11 लाख 70 हजार रुपये किंमतीच्या 23 मोटारसायकल जप्त केल्या आहेत. भिकाजी दादा अवघडे, युवराज अकोबा निकम व किशोर कुमार जगदाळे अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. 20 नोव्हेंबर रोजी दुचाकी चोरीचा एक गुन्हा शहर पोलिसांत दाखल झाला होता. त्याअनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम व त्यांचे पथक कसून शोध घेत होते.
बारामती : हातावर असलेल्या टॅटूवरुन पोलिसांनी आरोपीला केली अटक
यादरम्यान, पंढरपूर येथील कॉलेज चौकात यातील भिकाजी अवघडे हा दुचाकी विक्रीस आला असून गिऱ्हाईकाच्या शोधात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने विक्रीसाठी आणलेली दुचाकी चोरीची असल्याचे कबूल केले. तसेच युवराज निकम व किशोर जगदाळे या दोघांकडून नाममात्र ४४ हजार रूपयांना ही दुचाकी विकत घेतल्याचे त्याने सांगितले. यानंतर त्याकडून आणखी ४ दुचाकी जप्त करण्यात आल्या. दरम्यान, पोलिसांनी निकम व जगदाळे दोघांनाही अटक केली.
ADVERTISEMENT