पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा घवघवीत यश मिळवलं आहे. पंजाबचा अपवाग वगळला तर गोवा, मणिपूर, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या चारही महत्वाच्या राज्यांमध्ये भाजप पुन्हा सत्तेत आलेली आहे. या विजयानंतर दिल्लीत भाजप मुख्यालयातून कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचं अभिनंदन करत, २०२२ चे हे निकाल २०२४ च्या लोकसभा निकालांचं चित्र स्पष्ट करतील असंही विधान केलं.
ADVERTISEMENT
परंतू निवडणुक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी नरेंद्र मोदींच्या या विधानाचा समाचार घेतला आहे. नरेंद्र मोदींनी केलेल्या या विधानात फसू नका असंही आवाहन त्यांनी केलं आहे.
२०२४ च्या लोकसभेची लढाई ही त्याच वेळेला लढली जाईल. ही लढाई राज्यातील निवडणुकांच्या निकालावर लढली जाणार नाही. साहेबांना हे चांगलंच माहिती आहे. त्यामुळे या निकालातील यशाचा वापर करुन विरोधकांवर psychological advantage मिळवण्याचा हा प्रयत्न आहे. याला बळी पडू नका असं आवाहन किशोर यांनी आपल्या ट्विटर हँडलवर केलं आहे.
उत्तर प्रदेशात भाजपला गेल्या निवडणुकीच्या तुलनेत काही जागा कमी झाल्या असल्या तरीही बहुमतासाठीचा २०२ जागांचा आकडा भाजपने ओलांडून २७३ जागांवर बाजी मारली आहे. उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्येही भाजपने अशीच कामगिरी केली आहे. पंजाबमध्ये भाजपला अवघ्या २ जागांवर यश मिळवता आलं आहे.
इतक्या महागाईनंतरही लोकं भाजप जिंदाबाद म्हणत असतील तर… – हरिश रावतांची हताश प्रतिक्रीया
ADVERTISEMENT