BBC कार्यालयात Income Tax टीम, फोन जप्त करुन कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी

मुंबई तक

• 02:18 AM • 14 Feb 2023

मुंबई/नवी दिल्ली: राजधानी दिल्ली आणि मुंबईच्या बीबीसी (BBC) च्या कार्यालयावर आयकर (Income Tax) छापेमारी केली असून संपूर्ण कार्यालय सील करण्यात आलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व कर्मचाऱ्यांचे फोनही जप्त करण्यात आले आहेत. तसेच कर्मचाऱ्यांना कार्यालय सोडून घरी जाण्यास सांगण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. लंडनमधील बीबीसीच्या कार्यालयातून छापेमारीची ही माहिती देण्यात आली आहे. मात्र, अद्याप प्राप्तिकर […]

Mumbaitak
follow google news

मुंबई/नवी दिल्ली: राजधानी दिल्ली आणि मुंबईच्या बीबीसी (BBC) च्या कार्यालयावर आयकर (Income Tax) छापेमारी केली असून संपूर्ण कार्यालय सील करण्यात आलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व कर्मचाऱ्यांचे फोनही जप्त करण्यात आले आहेत. तसेच कर्मचाऱ्यांना कार्यालय सोडून घरी जाण्यास सांगण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. लंडनमधील बीबीसीच्या कार्यालयातून छापेमारीची ही माहिती देण्यात आली आहे. मात्र, अद्याप प्राप्तिकर विभागाकडून याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

हे वाचलं का?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा इंटरनॅशनल टॅक्सशी संबंधित मामला आहे. आयटीचं सर्चिंग बीबीसी कार्यालयात कर अनियमिततेबाबत सुरू आहे. दुसरीकडे, प्राप्तिकर विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा छापा नसून छाप्याआधीचं सर्वेक्षण करण्यात येत आहे.

दिल्ली ते मुंबई आयटीचे छापे

बीबीसीची मुंबईत दोन कार्यालये आहेत. एक बीकेसीमध्ये आणि दुसरं खारमध्ये. आयकर अधिकारी बीकेसी कार्यालयात पोहोचले आहेत. येथील कर्मचाऱ्यांना त्यांनी घरी जाण्यास सांगितलं आहे. दिल्लीतील बीबीसीचे कार्यालय इमारतीच्या 5व्या, 6व्या आणि 11व्या मजल्यावर आहे, या सगळ्या मजल्यावर आयटी अधिकारी उपस्थित आहेत.

दुसरीकडे काँग्रेसने या कारवाईचा संबंध हा बीबीसीच्या डॉक्यूमेंट्रींशी जोडला आहे. काँग्रेसने ट्विट करून म्हटले आहे की, ‘पहिले बीबीसीची डॉक्युमेंटरी आली. त्यावर बंदी घालण्यात आली आणि आता ITने बीबीसीवर छापे टाकले आहे. अघोषित आणीबाणी…’ असं ट्विट काँग्रेसने केलं आहे.

बीबीसीच्या डॉक्यूमेंट्रीचं नेमकं प्रकरण काय?

वास्तविक, बीबीसीने काही दिवसांपूर्वीच एक डॉक्यूमेंट्री रिलीज केली होती. ही डॉक्यूमेंट्री 2002 च्या गुजरात दंगलीवर आधारित होती. केंद्र सरकारने या डॉक्यूमेंट्रीला अपप्रचार असल्याचे सांगत त्याच्या प्रदर्शनावर बंदी घातली होती. याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत आयकर विभागाच्या छाप्यांचा बीबीसीच्या डॉक्यूमेंट्रीशी संबंध जोडून विरोधक आता मोदी सरकारवर निशाणा साधत आहेत.

दुसरीकडे खासदार महुआ मोइत्रा यांनी देखील ट्विट करून यावर जोरदार टीका केली आहे. ‘बीबीसीच्या दिल्ली कार्यालयात आयकर छाप्याची बातमी आहे. खूप छान… अनपेक्षित..’ असं खोचक ट्विट मोइत्रांनी केलं आहे.

    follow whatsapp