West Bengal Election Counting : भाजपच्या गद्दारीला लोकांनी चपराक दिली आहे – शिवसेना

मुंबई तक

• 09:00 AM • 02 May 2021

भाजपचं कडवं आव्हान मोडून काढत पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने तिसऱ्यांदा सत्तेच्या दिशेने वाटचाल केली आहे. ममता बॅनर्जींच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांची फौज उतरवली होती. परंतू सुरुवातीला हाती येत असलेल्या कलांचा आढावा घेतला असता पश्चिम बंगालच्या जनतेने पुन्हा एकदा ममतांच्या पारड्यात आपलं मत टाकल्याचं दिसतंय. भाजपचा […]

Mumbaitak
follow google news

भाजपचं कडवं आव्हान मोडून काढत पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने तिसऱ्यांदा सत्तेच्या दिशेने वाटचाल केली आहे. ममता बॅनर्जींच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांची फौज उतरवली होती. परंतू सुरुवातीला हाती येत असलेल्या कलांचा आढावा घेतला असता पश्चिम बंगालच्या जनतेने पुन्हा एकदा ममतांच्या पारड्यात आपलं मत टाकल्याचं दिसतंय.

हे वाचलं का?

भाजपचा जुना मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने या निकालांवरुन पुन्हा एकदा टोला लगावला आहे. शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपला टोला लगावत, “मोदींचा करिष्मा ओसरला आहे का यापेक्षाही राज्याचा विकास कोण करु शकतं, मातीशी कोण जोडलं गेलेलं आहे याचा विचार मतदारांनी केल्याचं दिसतंय. मोदींकडे जी लोकं आली होती ती ममता बॅनर्जींची लोकं होती. त्यामुळे लोकांनी एका प्रकारे भाजपच्या या गद्दारीला लोकांनी चपराक दिली आहे.”

राज्याचं नेतृत्व कोण करु शकतो, जनतेची काम करण्यासाठी कोण पुढे येऊ शकतो याचा विचार करुनच ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला लोकांनी कौल दिला आहे. पश्चिम बंगालमध्ये केंद्राने पूर्ण रसद पूरवली होती, पण तिकडे नेतृत्व करण्यासाठी चेहराच नसल्यामुळे जनतेने पुन्हा एकदा ममता बॅनर्जींनाच कौल दिल्याचं गुलाबराव पाटील यांनी सांगितलं.

शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनीही ममता दीदींचं कौतुक करत दीदी ओ दीदी…विजयाबद्दल बंगालच्या वाघिणीचं अभिनंदन अशा शब्दांत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

आणखी काय म्हणाले संजय राऊत?

भाजपच्या नियोजनाचं कौतुक केलं पाहिजे. कोरोना काळ होता तरीही देशाचे पंतप्रधान पश्चिम बंगालमध्ये प्रचारासाठी गेले. देशाचे गृहमंत्री गेले. हे सगळं कौतुकास्पद आहे. मात्र पश्चिम बंगाल जिंकणार ममता बॅनर्जीच. कदाचित बहुमत थोडंसं कमी होईल.. मात्र सत्ता ममतांचीच येईल याचा विश्वास आम्हाला आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

राज्या राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री बंगालमध्ये गेले होते. भाजपला या सगळ्याचा नक्कीच फायदा होईल. संध्याकाळी जेव्हा संपूर्ण निकाल जेव्हा हाती येतील तेव्हा ममता बॅनर्जीच मुख्यमंत्री होतील याचा विश्वास वाटतो कारण बंगालमधून त्यांना हरवणं सोपं नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp